पान:महमद पैगंबर.djvu/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रांतांची अडाणी मांडणी ११५ पाँच मोठी संस्थाने "काश्मीर, हैद्राबाद, म्हैसूर, ग्वाल्हेर व बडोदें या पांच मोठ्या संस्थानांचा प्रत्येक स्वतंत्र गट घटनाकायद्यांत दर्शविलेला आहे. या पांच संस्थानांचे अनुक्रमें क्षेत्रफळ ८४,२५८; ८२,६९८; २९,४८३; २६,३६७; व ८१,६०४ चौरस मैल आहे. १९३१च्या शिरगणतीप्रमाणे या संस्थानांची अनुक्रमें लोकसंख्या ३६,४६,२४३; १,४४,३६,१४८; ६५,५७,३०२; ३५,२३,०७० २४,४३,००७ आहे. हैद्राबाद संस्थानांत मुसलमान वस्तीचे शेकडा प्रमाण १०४ आहे; काश्मिरांत ते प्रमाण ७७७ आहे. म्हैसूर, ग्वालेर व बडोदें या संस्थानांतील मुसलमान वस्तीचे शेकडा प्रमाण अनुक्रमे ६१, ५:९, व ७२ आहे. हैद्राबादचे उत्पन्न सारखे वाढत असून अलीकडे प्रसिद्ध झालेला वार्षिक उत्पन्नाचा आंकडा ९१ कोटी निजामशाही रुपये इतका आहे. काश्मीरचे उत्पन्न २ कोटी ७० लक्ष रुपये आहे. म्हैसूरचे उत्पन्न ३,९८,८२,८०० रुपये आहे. ग्वालेरचे वार्षिक उत्पन्न सरासरी २।। कोटी रुपये असून बडोद्याचे उत्पन्नहि जवळजवळ तितकेंच आहे.. कलात व सिकम कलात व सिकीम या दोन संस्थानांचा प्रत्येकी स्वतंत्र गट पाडण्यात आला आहे. पहिले मुसलमानी संस्थानं बलुचिस्तान नजीक असून त्याचे क्षेत्रफळ ७३,२७८ चौरस मैल आहे. या संस्थानची लोकसंख्या ३,४२,१०१ आहे. संस्थानचे सरासरी वार्षिक उत्पन्न १५ लक्ष ७० हजार रुपये आहे. लासबेला हें छोटे संस्थान कलातच्या अंगभूत आहे व त्याची लोकसंख्या ६३ हजार आहे. या मुसलमानी संस्थानाचे वार्षिक उत्पन्न ३ लक्ष ६० हजार रुपये आहे. सिकिंम संस्थान तिबेट-नेपाळ सरहद्दीनजीक आहे. त्याचे क्षेत्रफळ २,८१८ चौरस मैल असून लोकसंख्या १,०९,८०८ आहे. सरासरी वार्षिक उत्पन्न १। लक्ष रुपये आहे. ::

रामपुर-बनारस . .. रामपुर में मुसलमानी संस्थान मध्य भारतांत असून त्याचे क्षेत्रफळ ८९३ चौरस मैल आहे. त्याची लोकसंख्या ४,६४,९१९ असून वार्षिक उत्पन्न