पान:महमद पैगंबर.djvu/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रांतांची अडाणी मांडणी ११३ देशी संस्थाने १९३५च्या घटना कायद्यांत फेडरेशनचे दोन प्रकार कल्पिलेले आहेत, स्वायत्त ब्रिटिश प्रांतांचे फेडरेशन आणि हे प्रांत व देशी संस्थाने मिळून होणा-या सर्व हिंदुस्थानचे फेडरेशन. या घटनेने मध्यर्वात सरकारच्या कारभारांत जी थोडीफार जबाबदारी देण्यांत आलेली आहे, ती बिनशर्त नसून सशर्त आहे. संस्थाने सामील होऊन सर्व हिंदुस्थानचे फेडरेशन झाले तरच ही जबाबदारी मिळावी अशी मेख कायद्यांत घालून ठेवण्यांत आलेली आहे. यामुळे हिंदी संस्थानांची बरीचशी तपशीलवार माहिती घटनाकायद्यांत अंतर्भूत करण्यांत आलेली आहे. आकार, उत्पन्न, लोकसंख्या वगैरे दृष्टींनीं ब्रिटिश प्रांत जसे एकसारखे नाहींत तशीच संस्थानेही सारखीं नाहींत. हिंदुस्थानांत एकंदर ६२७ संस्थाने आहेत. यांपैकी १४७ संस्थानांची नांवनिशीवार यादी घटनाकायद्यांत समाविष्ट करण्यांत आलेली आहे. ६२७ संस्थानांतलीं कांहीं संस्थाने किती क्षुद्र आहेत हे पाहणे मोठे मनोरंजक आहे. एका संस्थानाचे वार्षिक उत्पन्न ५०० रुपये असून त्यांतली लोकसंख्या २०६ आहे. दुस-याची लोकसंख्या १२५ असून उत्पन्न १६५ रुपये आहे. आणि सर्वांवर कळस म्हणजे, कोणा एका संस्थानाचे उत्पन्न ८० रुपये असून लोकसंख्या २७ आहे.* घटनाकायद्यांत ज्या १४७ संस्थानांचा नामनिर्देश करण्यांत आलेला आहे ती सर्वच महत्त्वाची आहेत असे नाहीं. या १४७ संस्थानांचे १७ गट पाडण्यांत आलेले आहेत. १७ व्या गटांत संस्थानांची नांवे दिलेली नाहींत. फक्त पहिल्या १६ गटांतच नांवें दिलेली आहेत. या गटांतल्या ठळक संस्थानांचा क्रमाने विचार करणे अवश्य आहे; कारण, मुसलमानांकडून हिंदुस्थानच्या फाळणीच्या ज्या योजना मांडण्यात आलेल्या आहेत त्यांत संस्थानांचाहि विचार करण्यांत आलेला आहे. डॉ. आंबेडकर यांनी मात्र संस्थाने वगळून ब्रिटिश हिंदुस्थानचाच तेवढा विचार केलेला आहे.

  • Federation 08. Freedom by Dr. B. R. Ambedkar,

८पाकि