पान:महमद पैगंबर.djvu/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रांतांची अडाणी मांडणी १०९. (भोंवतालच्या परिस्थितीमुळे त्यांच्यांत स्वतंत्रवृत्तीचा विकास झालेला आहे. वाच्याशी खेळत असलेल्या भोवतालच्या डोंगरपठारांमुळेच ही वृत्ति जन्मलेली दिसते. नियंत्रणांचा त्यांना तिटकारा वाटतो आणि त्यांच्या देशप्रेमाच्या स्वरूपांत धर्मप्रेमाची तीव्रता आहे.) साम, दाम, दंड, भेदादि उपायांनी या लोकांना आवरण्याचे काम सरकारला नेहमीं करावे लागते. या प्रांताची परिस्थिति अशी नाजूक असल्यामुळे, त्याची स्थित्यंतरेंहि पुष्कळ झाली आहेत. १९०१ मध्ये हा प्रांत पंजाबपासून अलग करण्यांत आला. दीर, स्वात, चित्रळ वगैरे भाग त्यांत सामील करण्यांत आले व त्याच्यावर चीफ कमिशनरची नेमणूक करण्यांत आली. हा प्रांत फिरून पंजाबला जोडावा अशा सूचना पुढे येऊ लागल्यामुळे या प्रश्नाची पहाणी करण्यासाठी १९२२ सालीं एक समिति नेमण्यांत आली. हा प्रांत पंजाबला जोडावा असे समितीपुढे आलेल्या हिंदु साक्षीदारांचे मत पडलें. , निदान येथील न्यायखाते तरी पंजाब हायकोर्टाच्या अधिकाराखालीं जावे अशी त्यांची मागणी होती. सरहद्दीवर पठाणांचा स्वतंत्र प्रांत असणे हे * हिंदुस्थानच्या अखंडपणाला बाधक ठरेल हो इषारा समितीला देण्यांत आला. परकी आक्रमण वेळीच थांबविण्याच्या दृष्टीने संतुष्ट पठा णांचा स्वतंत्र प्रांत उपयोगी पडेल असा कोटिक्रम लढवून, हा • इषारा अव्हेरिला गेला. या प्रांताला स्वायत्त प्रांताचा दर्जा देण्याचा विचार १९३२ सालीं ठरला.. या प्रांताचे क्षेत्रफळ १३,५१८ चौरस मैल आहे. १९३१च्या शिरगणतीप्रमाणे येथील लोकसंख्या २४,२३,३८० आहे. हिंदु वस्तीचे प्रमाण । शेकडा ५ आहे. कांहीं हजार शिखांचीहि वस्ती या प्रांतांत आहे. . .. १२. बलुचिस्थान बलूचिस्थानचे तीन महत्त्वाचे भाग पडतात. १८७९च्या तहाने ब्रिटिशांकडे आलेला भाग : याचे क्षेत्रफळ ९,४७६ चौरस मैल आहे. भाडेपट्टयाने : ब्रिटिशांकडे असलेली किंवा अन्य मार्गाने ब्रिटिशांनीं वहिवाटीला घेतलेला मलुख--याचे क्षेत्रफळ ४४,३४५ चौरस मैल आहे. कलात व लास-बेला