पान:महमद पैगंबर.djvu/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९८ पाकिस्तानचे संकट | सध्यांच्या बंगाल प्रांताचे क्षेत्रफळ ८२,९५५ चौरस मैल आहे व १९३१च्या शिरगणतीप्रमाणे या प्रांताची लोकसंख्या ५,०१,१४,००२ आहे. यांत मुसलमानांची लोकसंख्या २,७४,९७,६२४ आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येत मुसलमानांचे प्रमाण शेकडा ५४:१ आहे. हिदूची लोकसंख्या २,२०,००,००० आहे. केवळ लोकसंख्येला महत्त्व देऊन जातवारीच्या तत्त्वावर प्रतिनिधित्व दिले म्हणजे अन्याय कसा होतो याचें बंगाल में ठळक उदाहरण आहे. १९१९च्या घटना कायद्यांत मुसलमानांचे स्वतंत्र मतदारसंघ होतेच. पण मतदानाचा अधिकार सध्यांच्या इतका स्वस्त झालेला नव्हता. यामुळे काय प्रकार घडला हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. बंगालमधील मुसलमानांचे त्या वेळच्या लोकसंख्येतले शेकडा प्रमाण ५४.६ असूनहि, मतदारांच्या एकूण संख्येशी मुसलमान मतदारांच्या संख्येचे प्रमाण ४५.१ इतकेच होते. मुसलमानांची वस्ती बंगालच्या पूर्व भागांत विशेष आहे. या भागांतला हिंदुवंश मृत्युपंथाला लागल्यासारखा दिसतो, असे हृदयविदारक उद्गार सावित्रीदेवी यांनी काढले आहेत.* कृष्णपूर, कालीपूर, सीतारामपूर, अशा हिंदुत्वसूचक गांवांतल्या लोकवस्तींत हिंदु औषधालाहि मिळत नाहीं, असेहि सावित्रीदेवींनी म्हटले आहे. | मुसलमानांच्या मनांतून सगळाच बंगाल प्रांत हिंदुस्थानांतून तोडून पाकिस्तानांत सामील करावयाचा आहे. डॉ० आंबेडकर यांच्या कल्पनेप्रमाणेहि पूर्वबंगालचा अंतर्भाव पाकिस्तानमध्ये होण्यासारखा आहे. बंगालचा पूर्व भाग हाच अत्यंत सुपीक भाग आहे. तागाचें : पीक पूर्व व मध्य बंगालवर अवलंबून आहे. या तागाच्या पिकाच्या बाबतींत बंगाल प्रांत फक्त हिंदुस्थानांतच नव्हे तर सा-या जगांत अग्रगण्य आहे, हे विसरून चालणार नाहीं. ब्रह्मदेशच्या समृद्धीवर डोळा ठेवणाच्या ब्रिटिश व्यापा-यांनी ब्रह्मदेशच्या

  • Warning to the Hindus fWarning to the Hindus SReport of the Indian Statutory Commission, Vol. I, Survey, p. 61.

» ।।