पान:महमद पैगंबर.djvu/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रांतांची अडाणी मांडणी ९३ सुमारे २७,७५,००० एवढी संख्या ब्रिटिश भारतांत असून, उरलेली संस्थान हद्दीत आहे. १८८१ ते १९२१ या चाळीस वर्षांत खिस्त्यांच्या लोकसंख्येत दामदुपटीपेक्षांहि अधिक वाढ झाली आहे. मद्रास इलाख्याच्या अगदीं लगत असलेल्या त्रावणकोर व कोचीन या दोन हिंदु संस्थानांत खिस्ती लोकवस्तीचे प्रमाण प्रतिसल्लीं अनुक्रमे २९२ व २६८ आहे. | मद्रास इलाख्यांत मुसलमान वस्तीचे प्रमाण जेमतेम शेकडा ७ असल्याने त्या भागांत जातीय तेढ नाहीं, तेथे जातीय प्रश्न अस्तित्वांतच नाहीं असे म्हणून, डोक्यावरून पांघरूण घेऊन झोंपणाच्या स्वप्नाळू लोकांनी हे लक्षांत ठेवावें कीं, पाकिस्तानचा आधार असे जे निजामी राज्य तें दक्षिण भारतांतच आहे. किना-यालगतच्या मोपल्यांचा उपद्रव हिंदूंना कसा होऊ शकतो हे अलीकडच्या इतिहासांत स्पष्ट झालेले आहे. मोपल्यांचा हा मलबार प्रांत तोडून मागण्याची स्वप्ने मुसलमानांना पडत आहेत.* याच्या जोडीला दक्षिण भारतांत ख्रिस्ती मिशनन्यांच्या प्रचारकार्याचे फळ म्हणून खिस्त्यांचे संख्याबळहि वाढते आहे. या सर्व हिंदुबाधक घटनांचा ताप टाळावयाचा कसा या प्रश्नाचा विचार वेळीच झाला नाहीं तर, वायव्य सरहद्दीवर 'सिंधुस्तान' में अलग इस्लामी राज्य निर्माण करण्याचे स्वप्न मुसलमानांना जसे पडू लागले तसेच पुढे मागे नैर्ऋत्य हद्दीवर एखादें सुटसुटीतसे ' ख्रिस्तीस्तान' मागण्याचेंहि खिस्त्यांच्या मनांत येऊ शकेल. ही पट्टी समुद्रकिनायाची आहे आणि म्हणून संरक्षण आणि व्यापार या दोन्ही दृष्टींनीं ती फार महत्त्वाची आहे हे विसरून चालणार नाहीं. दक्षिण भारतांत निर्माण होणा-या या संभाव्य संकटाची कल्पना शक्य तितकी जास्त स्पष्ट होणे अवश्य आहे. या दृष्टीने या भागांतल्या ख्रिस्ती लोकवस्तीचे १९३१ च्या शिरगणतींतले आंकडेहि अभ्यासार्ह आहेत. या शिरगणतीप्रमाणे हिंदुस्थानांतील स्त्यिांची एकुणात ६२५ लक्षांजवळ आहे. १९२१च्या शिरगणतीच्या तुलनेने पाहतां ही संख्यावाढ शेकडा ३२५ इतकी आहे. यांतली शेकडा २० वाढ धर्मातरामुळे झालेली आहे. | *Pakistan by Dr. Rajendra Prasad, pp. 37 and 43.