पान:महमद पैगंबर.djvu/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रांतांची अडाणी मांडणी ८९ धोरणानेच ही प्रांतरचना करविण्यांत आलेली आहे. सध्यांच्या प्रांतांची संख्या, त्यांचे क्षेत्रफळ, त्यांतील लोकवस्तींतलें हिंदु-मुसलमानांचे प्रमाण इत्यादि गोष्टींचा नीट बारकाईने तपास केला की, १९३५च्या कायद्यानेच पाकिस्तानची पूर्वतयारी करून ठेवलेली आहे, हे स्पष्ट होईल. डॉ० आंबेडकर यांनीं Thoughts on Pakistan या पुस्तकांत काँग्रेसने मान्य केलेल्या प्रांतांची यादी दिली आहे. १९३५च्या कायद्याप्रमाणे आसाम, बिहार, ओरिसा, व सिंध हे प्रांत स्वतंत्र झाले ही गोष्ट काँग्रेसच्या प्रांतरचनेप्रमाणे हि वाजवीच झाली असे म्हणून, आंबेडकरांनी कर्नाटक-विभक्तीकरण व आंध-विभक्तीकरण यांबाबत चाललेली चळवळ व त्या चळवळीला मिळालेला काँग्रेसचा पाठिंबा यांचा उल्लेख केला आहे. या ठिकाणी हे लक्षात ठेविले पाहिजे कीं, ओरिसा प्रांत वेगळा करण्याची आवश्यकता काँग्रेसने भाषावार प्रांतरचना मान्य केली त्या आधीं पुष्कळच वर्षे भासू लागली होती. The Oriya Movement by Tvo Bachelors of Arts हे पुस्तक १९१९ साली प्रसिद्ध झालेले आहे. या पुस्तकांत दिलेल्या माहितीवरून असे दिसतें कीं, ओरिसा प्रांत बंगालमधुन वेगळा काढण्याची आवश्यकता माहितगार सरकारी अधिका-यांना १८६८ सालापासूनच भासत होती. हिंदुस्थान सरकारचा सेक्रेटरी H. H. Risley याने ३-१२-१९०३ रोजी बंगाल सरकारच्या चीफ सेक्रेटरीला लिहिलेल्या पत्रांत देखील या मुद्यावर भर देण्यांत आलेला आहे. ओरिसा प्रांत वेगळा करण्याला लॉर्ड कर्झन कबूल होता; पण, कांहीं प्रांतिक सरकारांच्या विरोधामुळे त्याने तो विषय तसाच सोडून दिला अशीहि माहिती वर उल्लेखिलेल्या पुस्तकांत दिलेली आढळते. ओरिसाची इतकी जुनी मागणी कित्येक वर्षांपर्यंत लोंबकळत राहिली होती. काँग्रेसने भाषावार प्रांतरचनेची पद्धति सुरू केल्यानंतर १२-१३ वर्षांनी ओरिसाचे स्वतंत्र स्थान सरकारकडून मान्य करण्यांत आले. सिंधची मागणी मात्र लगोलग स्वीकारण्यांत आली ! या दोन घटनांमधील फरक काँग्रेसच्या भाषावार प्रांतरचनेमुळे झालेला नसून, तो सरकारच्या नागमोडी धोरणांमुळेच झालेला आहे. काँग्रेसने आपल्या चळवळीच्या दृष्टीने व संघटनेच्या दृष्टीने प्रांतांची विभागणी भाषावारीच्या तत्त्वावर केली. राज्यकारभाराच्या दृष्टीने प्रांतांची फेर