सैन्य कसलेलें नव्हतें, कच्चें होतें, त्यामुळे लढाईची सरबत्ती उडण्यापूर्वीच ते भीतिग्रस्त झालेलें होतें, अर्थात मसनदअली चालकरून मोठ्या धडाक्यानें पुढे येत आहे, एवढी नुसती बातमीच त्या सैन्यास कळल्याचगेचर त्याची पूर्ण पांगापांग झाली. बहराम- खानाच्या मदतीस आलेला बागलाणचा राजा, आपल्या सैन्यासह जीव घेऊन पळून गेला; व बहरामखान व गोविंददेव हेही निराधार होऊन दौलताबाद येथें पळाले, पण तेथेही निभाव न लागल्यामुळे ते उभयतां गुजराथप्रतिति पळून गेले व हें बंड जाग- च्याजागींच थंड झालैं; त्याचा पूर्णपणे बोजवारा उडाला. बहामनी राज्याच्या नाशास प्रारंभ होईपर्यंत मराठे लोकांनीं त्याच राज्यांतील एक सरदार पुढे करून त्यास प्रमुखपणार्ने मदत देऊन व पुरवून उमारिलेलें, असें हैं पहिले, आणि शेवटचेंच बंड होय.
महंमदशहानंतर गादीवर आलेल्या सुलतानांन महंमदशहा ( कारकीर्द इ. सन १३७८ ते इ० सन १३९७०) हा मोठा विद्वान्, न्यायी, दयाशील व सद्गुणी निपजला गुलाम वंशांतील प्रसिद्ध राज्यकर्ता नासिरुद्दीन महमूदप्रमाणेंच "मी राज्याचा केवळ संरक्षक आहे; मालक नाहीं, " असेंच या शहाचेही मत असे; व तो गादीवर आल्यावर नेहमी पांढरे स्वच्छ व साधे कपडे वापरीत असे. त्यानें मलीक सैफ- उद्वनि या हुषार व राजकारणी पुरुषास आपला वजीर नेमले; व त्याच्याच सलयानें सुव्यवस्थित राज्यकारभार चालविला. त्याचे नैतिक आचरण कडक असून त्यानें मरेपर्यंत एकपनियतायें पूर्णपणे पालन केले; त्यास कवितांचा नाद असून तो स्वतःही कविता करीत असे; या सुलतानाने सुमारे १९ वर्षे मोठ्या शहाणपणाने राज्यकारभार चालविला आपल्या कारकीर्दीत निरर्थक युद्धे व रकशत होऊ दिले नाहीत; शिवाय तो मोठा उदार, शहाणा, विद्याव्यासंगी व रसिक असून विद्वान् व कविमंडळीचा चाहता होता; व त्याने अशा अनेक विद्याभ्यासंगी लोकांस उत्तेजन दिले होते; आणि विद्येच्या साकरितां गुलबर्गा, बेदर, खंदार, इलीचपूर, दौलताबाद, घोल व दाभोळ वगेरे ठिकाण शाळा संस्थापित केल्या होत्या; त्याने ठिकठिकाणी अनाथगृहे स्थापन केली,या लोकांस नेमणुका बांधून दिल्या; मुसलमानी धर्मोपदेशक टेविले व राज्यांत दुष्काळ पडला त्यावेळी स्वतः दहा हजार बैल बाळगून व बाह्य देशांतून धान्य आणवून ते गरीब लोकांना स्वस्त दराने देण्याची तजवीज केली; या सुलतानाने नेहमीं गरीबांचा परामर्ष घेत राहून आपला राज्यकारभार शांततेने चालविला असून त्याच्या औदार्य, दयालुत्व, रेमिकता, प्रजावात्सल्य, व राजकारणचातुर्य गेरे सद्गुणांच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत हा बादशहा आपले कर्तव्य पूर्णपणे जाणत असे; व परमे- बरानें जी राजसंपत्ति दिली आहे, तिथे राजलोक हे फक्त रक्षक आहेत; आणि