Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६६ )

 दक्षिणेतील पहिले मुसलमानी राज्य ह्मणजे ब्राह्मणां अथवा बहामनी राज्य हैं होय. या राज्याचा संस्थापक जाफरखान ऊर्फ हसन गंगो हा असून, त्याच्यासंबंधी व या राज्या- संबंधों पहिल्या भागांत बरीच माहिती दिली आहे; त्यामुळे मराठ्यांच्या उत्तपति पोषक, एवढीच माहिती फक्त याठिकाणी ग्रथित केलेली आहे. जाफरखान हा मोठा कर्तबगार मनुष्य असून तो गंगोपंडित नुजूमू ह्मणजे ज्योतिषी याच्याजवळ दिल्ली येथें गुलाम होता. हा गंगोपंडित महंमद तुघ्लख बादशहाजवळ एक प्रसिद्ध ज्योतिषी ह्मणून असून, त्याच्यावर बादशहाची अतिशय कृपा होती; व त्याच्याच शिफारशीमुळे बादशहाने हसन यास दहा हजार स्वारांची सरदारकी दिली होती; व त्यास दक्षिणेच्या सुभेदाराच्या मदतीस पाठविलें होते; त्यानंतर त्याने दक्षिणेत ३० सन १३४७ मध्ये एक नवीन राज्य स्थापन केलें; " सुलतान अल्लाउद्वान हसन गंगो बहामनी " असे नवें नांव धारण केले; गंगो पंडि ताच्या रुपेमुळे आपण वैभवास चढलों या उपकाराबद्दल आपल्या शिक्क्यांतही आपल्या नांवापुढे " बंदे सुलतानी हजरत सुभानी अल्लाउद्वान हसन गंगो बमहनी " असा त्याच्या नांवाचा उल्लेख केला; त्याला दक्षिणेत आणून आपल्या नवीन राज्याच्या जमाखर्चाचे काम सोपविले; मुख्यतः सर्व महाराष्ट्रदेशभर - ह्मणजे दक्षिणेस कृष्णानदीपासून उत्तरेस नर्मदा- नदीपर्यंत आणि पूर्वेस तैलंगणचे राज्य व गोडवणचा अरण्यमय प्रदेश, यांगसून तो पश्चिमेस थेट सह्याद्विपर्वतापर्यंत - आपल्या राज्याचा विस्तार केला, तेथील जुना हिंदूवतन- दारवर्ग त्यांच्या पूर्ववतनावर कायम केला; कर्तृत्ववान् हिंदूलोकांस लष्करी अधिकार देऊन त्यांना जहागिरीही दिल्या; व याच सुलतानाच्या कारकीर्दीपासून हिंदूंना व मराठ्यांना राजकीय वर्चस्व प्राप्त होण्यास प्रारंभ होऊन, हरनाक पोळ व कामराज घाडगे, हे मराठे मनसबदार उदयास आले.

 हसन गंगो नंतर त्याचा मुलगा महंमदशहा हा गादीवर आला. ( इ० सन १३५८ ते इ० सन १३७५) या शहाच्या कारकीर्दीत मराठ्यांनी बहिरामखान मशिद- राणी या नांवाच्या एका त्या शहाच्याच सरदारास उत्तेजन व मदत देऊन, एक मोठे बंड उमारिले. यावेळी महंमदशहा मृत्यू पावल्याची खोटी बातमी पसरली होती व दौलता- बाद येथील सैन्य कर्नाटक प्रांताच्या मोहिमेवर गेलेले होते; अशावेळी गोविंददेव ( जाधव ) या नांवाच्या एका कर्तृत्ववान व शूर मराठा सरदाराने पुढे होऊन, शहाविरुद्ध, बहिरामखान यास युद्धास प्रवृत्त केलें; स्वतः पुढारीपणा घेऊन त्याची सर्व व्यवस्था करून दिली; स्वतः आपले सैन्य बरोबर घेऊन तो बहरामखानाच्या मद- तीस आला; आणि बागलाण व वन्हाड प्रांतांतील राजांकडूनही गुप्तपणानें त्यानें मदत मिळविली. नंतर बहिरामखानानें महाराष्ट्रांतील बराचसा प्रदेश ष प्रसिद्ध दौलता बादचा किल्ला आपल्या ताब्यांत घेतला; हस्तगत करून घेतलेल्या प्रदेशांतून वसूल