वं तो रोहणखेडा घाटाकडे वळला; परंतु त्याच्या शत्रूस त्याच्या हालचालीची पूर्ण माहिती
नेहमी मिळत असल्यामुळे त्यास सिंडीत गांडून नामशेष करण्याच्या इराद्यानें त्यांनी हा घाट-पूर्णपणे अडवून धरिला, त्यामुळे तो मोलांडून जाण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या सैन्याची अतीशय प्राणहानि होईल—आणि शिवाय आपल्या ह्या धाडसाच्या कृत्यांत आपला प्राभव झाल्यास आपले पुढील सर्व बेत विस्कळीत होतील; सततच्या प्रवासाने व दुगद्गीनें त्रासत चाललेलें आपले सैन्य पूर्णपर्गे नाउमेद होऊन त्यामुळेच शत्रुच्या सैन्याला उत्तेजन मिळून तें उत्साहपूर्ण होऊन जोरांत येईल अशी त्यास भीति वाटू लागली, ह्मणून त्यानें
टाळून दुसऱ्याच एका मार्गानें पलीकडे जाण्याचा निश्चय करून त्याप्रमाणे मार्ग कमण्यास
सुरवात केली, परंतु तो रस्ता बिकट व सैन्यसामुग्रीच्या वाहतुकीस अवघड असून शिवाय
सर्व मार्गभर पाण्याचीही अतीशय टंचाई होती, त्यामुळे त्याच्या सैन्याचे मार्गात विशेष हाल
होऊं लागले; व त्या सैन्यास पुढे पाऊल टाकणेही जिवावर आले. इतक्यांत येथून जवळच
तीन कोसांवर पाणी आहे, अशी जमालखान यास बातमी मिळाली, तेव्हां त्यानें तिकडे कूच करण्याविषयी आपल्या सैन्यास हुकुम दिला; व त्या ठिकाणापर्यंत त्याचें सैन्य, आपणांस पाणी मिळेल, या आशेनें लवकरच येऊन दाखल झाले. पण तेथे आल्यावर ती जागाही शत्रूनी अडवून धरिली आहे, असे त्यास आढळून आले तेव्हां-चोहोंकडून अशा सारख्या अडचण, हाल- आपत्ति व शत्रुसैन्याचा त्रास सोशीत राहण्यापेक्षा एकदांच काय तो
सोक्षमोक्ष करावा, अशा निश्चयानें तो आपल्या सैन्यासह, शत्रुसैन्यावर-बुन्हाण निजामशहा
याच्या तेथेंच पाणी अडवून असलेल्या सैन्यावर एकदम मोठ्या जोरानें तुटून पडला;
आगि बुन्हाणशहाचा पूर्ण पराभव होऊन, जमालखान यशस्वी होणार, असा सुमार दिसं
लागला; इतक्यांत अकस्मात शत्रुसैन्यांतील एक गोळी येऊन ती जमालखानाच्या मर्भ-
स्थानी लागली व त्याबरोबर तो तात्काळ जागच्याजागीच ठार झाला तेव्हा लागलींच
त्याची फौज नाउमेद होऊन भीतीने समरभूमी सोडून पळून गेली; आणि बुन्हाणशहास
निर्विवादपणे विजयप्राप्ती होऊन तो लागलीच अहंमदनगर येथील निजामशाही राज्याचा
अधिपति बनला. जमालखानाच्या मृत्यूनंतर त्याच्या सैन्याच्या झालेल्या पळापळीतच-
सुलतान बुन्हाण निजामशहाचा धाकटा मुलगा व निजामशाहीचा माजी राज्यकर्ता- इस्माईल
शहाही होता, त्यास बुन्हागशाच्या लोकांनी पकडून आणून बुन्हामशहाच्या हवाली केले
व शहानें त्यास प्रतिबंधांत ठेवून राज्य सूत्र आपल्या हातांत घेतली; (इ० सन १५९१
मध्ये. ) आणि अशारीतीने महूदी पंथानुयायी लोकांच्या राजकीय वर्चस्व मिळविण्याच्या
बाबतींतील प्रतिस्पर्धेमुळे उत्पन्न झालेल्या एका लक्षात ठेवण्यासारख्या थंडाचा बीमोड कर
ण्यांत येऊन, निजामशाही राज्यांत पुन्हां पूर्वीप्रमाणे शांतता प्रस्थापित करण्यांत आली.
पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/७५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४८)