पूर्वीच - चिरडून टाकिलें; या थंडीत सामील असलेल्या प्रमुख मंडळीस ताबडतोब पकडून ठार मारिलें; आणि आपला धाकटा भाऊ मिझी महंमद खुदाचंद यास गोवळकोंडे येथील किल्ल्यांत प्रतिबंधांत ठेविले याठिकाणीं तो पुढे दोन वर्षांनी मृत्यु पावला - प्राणि अशा रीतीनें पुन्हा राज्यांत शांतता प्रस्थापित झाली.
वरील तांत्रिक हकीकतीवरून शिया व सुनी यांच्यामधील तीव्र विरोधामुळे दक्षिणेतील मुसलमानी राज्यांमध्यें, कशी चमत्कारकि राजकीय परिस्थिति उत्पन्न होत गेली याबद्दल कोणासही योग्य अनुमान बांधितां येईल. मुसलमानांत शिया व सुनी या पंथाप्रमा पेंच सुफी, वाहची, सय्यद, शेख, हबशी, युझचेग, अफगाण, तुर्क वगैरे निरनिराळे पोटभेद अथवा पंथ आहेत. त्यांपैकी सुफी पंथांतील लोक बहुधा साधुवृत्तीने राहतात. याशिवाय इतर सर्व परदेशी लोक मोंगल बादशाहीत आणि दक्षिणेतील सर्व मुसलमानी राज्यांत सैन्यामध्ये नोकरी करीत असत. याशिवाय, " मद्ददी " या नांवाचा एक पंथ असून त्यांतील लोक विशेष कडवे असतात. या पंथाचा शिया व सुनी या पंथाप्रमाणे इतर कोण- त्याही पंथाशी तीव्र मतभेद नाहीं तरी स्वपंथाचें व स्वपक्षाचे महत्व व वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या अट्टाहासामुळे, धार्मिक मतभेदास तीव्र स्वरूप प्राप्त होऊन, दक्षिणेतील निजाम- शाही राज्यांत, इस्माईल निजामशहाच्या कारकीर्दीत, ( कारकीर्द, इ. सन १५८८ ते इ. सन १५९१). हा नवा पंथ निर्माण होऊन त्यामुळे त्या राज्यांत भयंकर घोटाळे माजून गेले आणि पक्षभेद विकोपास जाऊन व युद्धकलह जोरांत येऊन, कांहीं काळपर्यंत निजामशाही राज्यांत पूर्णपणे अंदाधुंदी माजून गेली, मिरान हुसेन निजामशहा याच्या कारकीर्दीत, जमालखान या नांवाचा एक दक्षिणी पक्षाचा, आणि महूदी पंथाचा सरदार बराच बलिष्ट झालेला होता. मिरान हुसेन याचा इ. सन १५८८ मध्यें खून झाला; व मूर्तजा निजाम- शहाचा माऊ बु-हाण निजामशहा याचा राज्यपदारूढ होण्याचा प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर तो अकबर बादशहाच्या आश्रयास जाऊन राहिला; तेव्हां त्याचे दोन्ही मुलगे इब्राहीम व इस्माईल हे लोहगडे येथें प्रतिबंधांत होते त्यांकी इस्माईल यास मिरान हुसेनच्या मृत्यूनंतर
१ टीपः - लोहगड हे ठिकाण व हा प्रसिद्ध डोंगरी बळकट किल्ला पुणे जिल्ह्यांत, भोरखिंडीच्या माथ्यावर, खंडाळ्यापासून चार मैलांवर नैऋत्य दिशेस आहे. हा जुना किल्ला बहामनी राज्याच्या वेळेपासून प्रसिद्ध असून, ३० सन १६४८ मध्ये तो शिवाजीने घेतला. पुढे तो अवरंगझेचाकडे व पुन्हा मराठ्यांकडे येऊन, इ० सन १७१३ मध्ये कान्होजी आंग्रे याच्यापासून बाळाजी विश्वनाथाकडे आला; बाळाजी हा याच ठिकाणी रहात आते. मुसलमानी काळांत व पुढे पेशव्यांच्यावेळी या किल्ल्यावर राजकीय कैदी ठेवीत