Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जसजसी अधीक अधीक दारू आपल्या पशांत ओतीत गेला, तसतशी त्याची दारूची भूक सारखी वाढत गेली; त्याचा दरबार दारूबाजांचा अड्डा बनला; त्याचा परिवार दारूड्यांचा गोट बनला; राज्याची सूत्रे वसनी व नालायक दारूबाजांच्या हातांत गेली; त्याने सुरू केलेला दारूचा सांप्रदाय अतीशय वृद्धि पावून त्याच्या प्रजेनेही त्याचें अनुकरण केलें; माननीय साधूलोक इतके दारूबाज बनले की खुद्द त्यांच्या अंगांतील कपडे सुद्धां दारू दुकानदाराकडे गहाण पडले. पाठशाळांतील पूज्य शिक्षकमंडळीही आपला व्यवसाय सोडून देऊन मद्याच्या मजलसीत पुढारीपणानें भाग घेऊन व पूर्ण दारूबाज बनून झिंगूं लागले; शहाचा अधिकार नामशेष होऊन आणि बहामनी राज्यांतील बलिष्ट सरदारांनी आपआपले सवते सुभे निर्माण करून, इ० सन १४९३ च्या सुमारास, तें राज्य कसें तरी जीव जगवून जिवंत राहण्यापर्यंत हीनस्थितीत पोहोचलें; आणि अशा कुतरओढीतच अखेरीस इ० सन १५२६ मध्यें, या बहामनी राज्याची समाप्ती झाली.

 बहामनी राज्याशसून निरनिराळीं पांच राज्यें-ह्मणजे अहंमदनगर येथील निजाम- शाही, विजापूर येथील अदिलशाही, गोवळकोर्ड येथील कुत्बशाही अथवा कुतुबशाही, बेदर येथील बेरीदशाही, आणि वन्हाडची ह्मणजे गाविलगेडची इमादशाही, हीं पांच राज्य- निर्माण झाली. त्यातील काही राज्यांतही अशाच प्रकारची तीव्र धार्मिक मतभेदामुळे भयंकर धोक्याची राजकीय परिस्थिती उत्पन्न झाली; आणि त्या राज्यांनाही बहामनी राज्याप्रमाणेच हा वैरभाव नडून, त्यांच्या नाशास इतर अनेक कारणांबरोबर हैही एक प्रमुख कारण होऊन बसलें.

 अहंमदनगर येथील निजामशाही राज्य स्थापन करणारा अहंमदशहा हा इ. सन १५०८ मध्यें मृत्यु पावला; व त्याचा सात वर्षीचा अज्ञान मुलगा बुन्हाण निजामशहा हा त्याच्या जागी गादीवर आला. शहा ताहीर या नावाचा एक साधू व विद्वान् आणि मुत्सद्दी पुरुष या बुन्हाण शहाच्या आश्रयास होता, त्याच्या अनुमतीने इ. सन १५३७ मध्यें शहानें अबू बकर, (इ. सन ६३२ ते इ. सन ६३४, ) उमर (इ. सन ६३४ ते इ. सन ६४४)


 १ टीप:-गाविलगडचा डोंगरी किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या अतीशय महत्वाचा असून तो वन्हाडति उमरावती जिल्ह्यांतील मेळघाट तहशिलींत आहे. हा किल्ला विशेष अवघड असून त्याच्या एका अत्युच्च टोंकावर एक सुंदर मशीद आहे, व ती अतीशय भव्य असून तीत आठ तलाव आहेत व त्यांतील चार तलावात बाराही महिने उत्तम पाणी रहात असून त्यांत जिवंत झरे आहेत. वन्हऱ्हाड प्रांताच्या उत्तरेस मेळघाटात सातपुडा पर्वताचे फांटे पसरले असून त्यांस " गाविलगडचे डोंगर " अर्से ह्मणतात; व त्यांतच गाविलगडचा किल्ला आहे. गाविलगडच्या डोंगराचें " वेराट" हे उंच शिखर असून त्याची उंची समुद्रसपाटी-पासून ३९८९ फूटं आहे.