राजधानीत बोलावून घेवविलें, आणि त्यांच्या सैन्याची पाहणी करण्याच्या मिषानें त्यांनी राजवाड्यासमोर आणविलें; नंतर त्याठिकाणी शहाने त्यांना सांगितलें कीं, परदेशी सैन्य बंडखोर झाले असून त्या सैन्यानें शहरांत अतीशय अत्याचार केले आहेत; त्यामुळें आर्ता परदेशी लोकांविरुद्ध दक्षिणी सैन्य उपयोगात आणणे भाग आहे. त्यानंतर निजामाच्या हुकुमाप्रमाणे दक्षिणी सैन्य लागलीच परदेशी लोकांवर मोठ्या निकराने तुटून पडलें; व त्यांचा कोंडमारा करून त्यांची भयंकर कत्तल उडविली. तथापि यूरिशखान, खुश कदमखान वगैरे मंडळी दक्षिणी लोकांशी लढत लढत वेशीजवळ आली; व देशांचे दरवाजे फोडून त्यानीं दर्याखान वगैरे आपल्या परदेशी सरदारांचे सैन्य अति घेतलें. त्यानंतर सतत बीस दिवस राजधानीत सारखा रक्तपात सुरू होता. या अवधीत उभय पक्षांकडील मिळून निदान चार हजाराहून अधीक लोक मारले गेले; अखेरीस पुष्कळ मध्यस्थी केल्यावर युसफू आदिल- शहा हा आपल्या अनुयायांसह विजापूर येथें व फत्तेउल्ला इमाद-उल-मुल्क हा वन्हाडांत परत गेला व ही भानगड कशी तरी एकदांची निकालास लागली.
तथापि निजाम-उल-मुल्कू, व इमाद-उल-मुल्क यांचें वर्चस्व दिलावरखान अशी या नांवाच्या एका सरदारास सहन होत नव्हते; ह्मणून त्यानें एक दिवस शहा एकटा आहे असे पाहून, त्या उभयतांविषयीं त्याचें मन कलुषित केलें; व त्यांना ठार मारण्याची शहाकडून परवानगी मिळविली; व त्यानंतर ते उभयतां राजवाडयांत आल्यावर, दिलावर - खानाने त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला; परंतु तो निष्फळ झाला; तेव्हां दिलावरखान जिवाच्या भीतीनें आपल्या बायकामुलांसह बन्हाणपूर येथे पळून गेला; इकडे कासीम बेरीद या सरदाराने निजामाच्या तर्फे राजवाडा आपल्या ताब्यांत घेऊन व सर्व द्वारविर नाकेबंदी करून शहाचे दळणवळण पूर्णपणे बंद केलें; तेव्हां नाइलाजानें शहानें निजामाची क्षमा मागितली. नंतर निजाम आपला मुलगा मलिक अहमद यासह पुन्हा राजधानीत येऊन आपल्या वजीरी पदावर स्थानापन्न झाला; व इमाद उल-मुल्कू हा वन्हाडप्रतिति आपल्या सुभेदारीवर परत निघून गेला. त्यानंतर लवकरच पुन्हा परदेशी लोकांचा पक्ष जोरांत आला; बेदर येथील सुभेदार पसंदखान यानें निजाम-उल-मुल्क पास ठार मारिलें; त्याचें शीर मुद्दाम मनुष्याबरोबर महंमदशहाकडे ताबडतोय पाठवून दिले आणि अशा रीतीनें शहाची निजामाच्या त्रासांतून कायमची मुक्तता झाली.
१ टीप:- बेदर है शहर हल्लीं निजामाच्या राज्यांत, त्याच जिल्लाचें मुख्य ठिकाण असून ते राजधानीचे शहर हैद्राबाद येथून ७५ मैलांवर, मांजरानदीच्या पूर्व- कांटावर आहे. हे शहर बहामनी राज्याच्या राजधानीचे ठिकाण असून तेथे किल्ल्याचे व इतर पूर्ववैभवाचे पुष्कळ अवशेष हल्लींही हग्गोचर होतात.