प्रदेशावर स्वारी केली; आणि शिर्के व शंकरराय, या उभयतांची राज्यें नामशेष करून
तिकडे आपला अंमल बसविला.
वरील कत्तलीतून थोडेसे लोक मोठ्या कष्टानें बचावून परत येऊन त्यांनीं
चाकणच्या किल्ल्याचा आश्रय घेतला; दक्षिणी लोकांच्या विश्वासघातामुळेच परदेशी
लोकांवर हा भयंकर प्रसंग कोसळला असल्यामुळे परदेशी सय्यद मंडळींनी, " ही सर्व
हकीकत आह्मी शहास कळवितों, " अशी दक्षिणी लोकांस धमकी दिली; त्यावेळी
आपले कारस्थान बाहेर फुटेल, या भीतीनें दक्षिणी लोकांनी अगोदरच या परदेशी लोकां-
विरुद्ध शहाकडे भलभलत्या हकीकती लिहून पाठविल्या; व दुरबारांतील शीर-उलू-मुल्कू
दक्षिणी व इमाइ-उल-मुल्कू घोरी, याचा मुलगा निजाम-उल-मुल्क् यांनी त्या शहास
फुगवून सांगून त्याचें मन परदेशी लोकांविषयों पूर्णपणें कलुषित करून टाकिलें; त्यामुळे
शहास अत्यंत राग आला आणि त्याने सर्व परदेशी लोकांस पकडून ठार मारण्याबद्दल
हुकूम दिला; त्याप्रमाणें दक्षिणी सरदार मंडळी आपल्या मोठ्या सैन्यानिशीं चाकणवर चाल
करून गेली; इकडे ही सर्व हकीकत परदेशी लोकांस कळल्यावर आपण पुर्णपणे निरपराधी असल्याची व एकंदर खन्या हकीकतीचीं पत्रे, त्यांनीं शहाकडे रवाना केलीं, परंतु दक्षिणी लोकांनीं तीं मधल्यामर्धेच दाबून टाकिलीं; आपल्या सैन्यासह चाकणच्या किल्ल्यास वेढा देऊन, त्यांत परदेशी लोकांस कोंडून टाकिलें; आणि परदेशी लोकांनीं, मरेपर्यंत किल्ला लढविण्याचा निश्चय केल्याचें दक्षिणी सरदार शीर-उलू-मुल्क यास कळल्यावर त्यानें कोंकणच्या स्वारीवरून आपल्या दक्षिणी सैन्यास बोलावून घेऊन वेढा दिलेल्या सैन्यास किल्ला हस्तगत करून घेण्यास मदत केली; परंतु परदेशी लोक निर्वाणीने लढत असल्यामुळें त्याचा कांहीही उपयोग झाला नाहीं. पुढे किल्लयांतील धान्यसामुश्री संपत आल्याचें पाहून परदेशी सरदार मंडळींनी आपल्या बायकामंडळींच्या संरक्षणार्थ काहीं इसम किल्ल्यांत ठेवून "शत्रूवर निकरानें तुटुन पडावें, व त्यांची फळी फोडून, थेट शहास जाऊन भेटून, सर्व खरी इककत त्यास कळवावी. " असा मनसुचा केला; ही हकीकत दक्षिणी मंडळीस कळल्यावर त्यांना अतिशय भीति उत्पन्न झाली; व या परदेशी मंडळींना नामशेष करण्याकरितां त्यांनी एक निराळेंच कपटजाल पसरिलें. तुमच्या अपराधाची क्षमा करण्याविषयीं, आह्मी दक्षिणी लोकांनी शहास विनंती केल्यावरून,त्यानें गळू होऊन, तुलांस क्षमा केली आहे; आणि तुमच्या अथवा नुमच्या बायका-मंडळींच्या केसासही धक्का न लावितां, तुझा सर्वोस शहानें आपल्या राज्याच्या बाहेर निघून जाण्यास परवानगी दिली आहे" अशा आशयाचा शहाचा एक खोटा हुकूम
त्यांना दाखविला व तुमच्या जिवास आह्मीं धक्का लावणार नाहीं; अशा त्यांनी स्वतःही शपथा