दिला त्यावेळी तुजार यानें, “ यावेळी फक्त परदेशी सैन्य माझ्याबरोबर द्यावें, " अशी
अल्लाउद्दीनशहा यास नम्रपणानें विनंती केली. त्याप्रमाणे शहानें त्याच्याबरोबर फक्त पर
देशी सैन्य दिलें; हें सैन्य घेऊन तुजार नासीरखानावर चाल करून गेला; त्याचा पूर्ण रा
जय केला; आणि पुष्कळ लूट मिळवून तो यशस्वीपणानें परत येऊन शहास भेटला, त्यावेळी शहानें “ यापुढे दरबारांत पहिला मान दक्षिणी लोकांस न मिळतां परदेशी लोकांस मिळावा "असे फर्माविलें, त्यामुळे दक्षिणी व परदेशी लोकांमधील चालत आलेल्या हाडवैराला जोराचें चालन मिळालें व पुढे त्याचे परिणाम अत्यंत अनिष्ट होऊन ते अखेरीस बहामनी राज्यासही खडतरपणें भोगावे लागले.
विजयानगर येथील देवरायाविरुद्ध विजय मिळविल्यानंतर लवकरच अल्लाउद्दीन शहा अतीशय विषयासक्त झाला, त्याने आपली राज्यव्यवस्था प्रधानमंडळाकडे सोपविली आणि मनोहर स्त्रिया व मौल्यवान मधें यांतच तो रात्रंदिवस मषगुलू होऊन राहिला यावेळीं शहाचा वजीर मियामन-उल्ला दक्षिणी यानें कोंकणपट्टीतील समुद्रकिना-यावरील सर्व किल्ले हस्तगत करून घेण्याचा विचार केला; व शहाच्या अनुमतीने त्यानें या कामगिरीवर तुजार याचीच नेमणूक केली; व त्याच्याचरोचर परदेशी सैन्यासह दक्षिणी, हबशी वगैरे सैन्यही रवाना केलें; व यावेळीं तुजार यास काय भुरळ पडली कोण जाणे, पण तो परदेशी लोकांशिवायचें इतर सैन्य विशेषतः दक्षिणी सैन्यही- बरोबर घेऊन या मोहिमेवर गेला. त्यानंतर तुजार यानें पहिल्याने चाकणचा किल्ला आपल्या हस्तगत करून घेऊन तेथें आपलें मुख्य ठाणें ठेविलें आणि तेथून कोंकणांत सैन्याच्या तुकड्या पाठवून तिकडील कित्येक राज्यकर्त्यांना त्यानें शहाच्या अंकित होणें भाग पाडिलें;नंतर तो स्वतः कोंकणांत गेला; आणि तिकडील " शिर्के " या नांवाच्या मराठा राजास त्याने जिंकलें व त्यास आपल्या स्वाधीन होणें भाग पाडिलें. त्यावेळी तुजार यानें शिर्क्यास असा आग्रह केला कीं, " तूं मुसलमानी धर्माचा स्वीकार कर; नाहीं तर तुला ठार मारीन. " त्यावेळी मोठ्या धूर्त व नम्रपणानें तुजार यास अशी विनंती केली की, " येथून जवळच - संगमेश्वरच्या दक्षिण बाजूस, खेळणा ऊर्फ विशाळगैड या नांवाचा एक
१ टीप:- चाकण हे गांव व किल्ला, पुणे जिल्ह्यांत, खेड तालुक्यांत खेडपासून
६ मैलांवर असून येथील किल्ला पूर्वकाळी विशेष महत्वाचा ह्मणून गणला गेला होता.
२ विशाळगड है संस्थान कोल्हापूरकर छत्रपतीचें मांडलीक असून तेथील संस्थानिकांस
“पंतप्रतिनिधी " असा किताब आहे विशाळगड ही या राज्याची पूर्वीची राजधानी असून
मलकापूर ही हलींची राजधानी आहे. विशाळगड हे ठिकाण मलकापूरपासून अजमा ३६
मैलांवर असून मलकापूर है कोल्हापूरपासून पश्चिमेस २८ मैलांवर शाळी नदीच्या कांठीं आहे;