आणि तो सतः सुनीपंथाचा असल्याने, त्याच पंथाचा मलिकंचर यास मिळून,
मोंगलांनी जिंकलेला निजामशाहीतील पुष्कळ प्रदेश त्यास दिला. - उलटपक्ष
इ० सन १६१६ मध्ये शहाजादा खुरंभ, भाषी शहाजहान यानें जहांगीरच्या हुकुमानें
दक्षिणेत निजामशाहीवर स्वारी केली, त्यावेळी मलिंकंबर हा सुनी पंधाचा, आणि
विजापूर व गोवळकोंडे येथील राज्यकर्ते शियापंथाचे असल्याने त्यांनी मलिकंबर
यास मदत केली नाहीं; त्यामुळे मालकंबर याचा पराभव होऊन, ह्मणजे दक्षिण-
तील मुसलमानी राज्यांतील हो धार्मिक वैमनस्यै शहाजहान यास फारच फायदेशीर
होऊन अहंमदनगर पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेले. पुढे जहांगीरच्या मृत्यूनंतर शहाजहान
गादीवर आल्यावर त्याने सानजहान यास दिल्लीत बोलाविलें; परंतु त्याप्रमाणें तो तिकडे
गेला नाहीं. नंतर शहाजहान यानें महबतखानास पुन्हां दक्षिणेच्या सुभ्यावर पाठविलें; आणि
खानजहान याची माळवा प्रांताच्या सुभेदारीवर नेमणूक केली. त्यानंतर शहाजहान
त्यास पुन्हा दिल्ली येथे बोलावलें, व त्याप्रमाणें यावेळीं तो तिकडे गेला. त्यावेळी
शहाजहान यानें त्याचा योग्य सत्कार केला; परंतु बादशहाची ही वागणूक वरपांगी असून
तो आपणास दग्यानें कैद करणार आहे, असा त्यास संशय आला; व शहाजहानविरुद्ध
बंड करण्याचा निश्चय करून तो तेथून पळाला. यावेळी त्याच्याबरोबर त्याच्या दोन
बायका व तीन मुले एवढा परिवार होता. त्यांपैकी उभयतां खियांनी आपण होऊन एक
खोलीत कोंडून घेऊन गुप्तपणें आपल्या जिवाचा नाश करून घेऊन, खानजहान यास
आपल्या काळजीतून मुक्त केलें ! या स्त्रियांच्या मृत्युमुळे त्यास अतीशय दुःख झाले; परंतु ती दुःख करीत बसण्याची वेळ नव्हती; ह्मणून त्या स्त्रियांची अखेरची व्यवस्था करून
त्याने आपल्या तिन्ही मुलांस बरोबर घेतले; व पाठीवर असलेल्या यादशाही सैन्यास दाद
न देता, आपल्या विश्वासू व जिवास जीव देणाऱ्या दोन हजार सैन्यासह बुंदेलखंड व
गोंडवण या मार्गानें तो दक्षिणेत आला.
अफगाण आणि मोंगल, यांचें वांकडे असून अफगाण लोकांकडून मोंगल
लोकांनी राजसत्ता हिसकावून घेतल्यामुळे, लोदी घराण्याला नामशेष करून बाबर यानें
दिल्ली येथील तख्त मिळविलेले असल्यामुळे आतां पुन्हा तसाच उलट प्रसंग येतो की काय अशी खानजहानच्या बंडामुळे शहाजहान यास स्वाभाविकरीत्याच भीति वाटू लागली.
शिवाय त्याचा पक्ष सारखा प्रबळ होत जाण्याने ती दुणावत गेली, छत्रपति शिवाजीचा बाप
शहाजो त्यास मिळालेला होता; निजामशाही सरदार त्यास अनुकूळ झालेले होते, आणि
विजापूर व गोवळकोंडे येथील राज्यकर्ते जर त्यास अनुकूळ झाले तर दक्षिणमांत-
अत्यंत खर्चाने, थमानें व त्रासानें मिळविलेला दक्षिणप्रांत आपल्या हातचा जाईल,