मोठा समारंभ करीत असे व सूर्याची मूर्ति मोठ्या समारंभाने गादीवर यसवून तो तिची
पूजा करीत असे, दरदिवशीं भिन्न रंगाचे पोषाख करून तो सप्त ग्रहांची पूजा करीत असे;
व आपल्या रजपूत राण्यांबरोबर तो यज्ञयाग व ब्राह्मणोक्त धर्मविधी करून, ब्राह्मण स
दक्षणा देत असे; परंतु अकबराचें है धर्मचाह्य वर्तन व त्यानें नवीन धर्माचा केलेला उप-
क्रम या गोष्टी आम्रा येथील उलमा मंडळीस बिलकूल पसंत नव्हत्या ही उलमा मंडळी
व त्यांचा पुढारी व मुख्य धर्माध्यक्ष मखदुम्-उल्नुल्कू हे कट्टे सुनीपंधानुयायी असून शिया-
पंथानुयायी मंडळीविरुद्ध त्यांची सारखी खटपट सुरू होती. अकबर पूर्ण राज्याधिकारी होई-पर्धेत चद्गमखान हाच सर्वसत्ताधीश होता, परंतु तो शियापंथी होता; त्यामुळे सर्व शिया-पंधानुयायी मंडळीप्रमाणेच, त्याच्याविषयीहि उलमा मंडळींचें प्रतिकूळ मत होते; पण तो पूर्ण सत्ताधीश असल्यानें या उलमा मंडळीस, उघड्या डोळ्यांनी शियापंथाचें वर्चस्व पहात स्वस्थ बसावें लागत होतें, परंतु त्याचा पाडाव झाल्यावर ही उलमा मंडळी जोरांत आली,वशियापंथाविरुद्ध त्यांनी मोठ्या जोरानें खटपट करण्यास सुरवात केली, अकचराला आपल्या मुठीत आणण्याचा दीर्घ प्रयत्न केला; व अकचर हा त्यांच्या तंत्राने वागणारा नसल्यामुळे त्यांनी त्याच्या विरुद्ध आणि त्याच्या नग्या धर्माविरुद्ध मोठा गिल्ला चालविला आणि 'जुना" व " नवा " असे दोन पक्ष निर्माण होऊन, हें धार्मिक भांडण जोरात येण्या
सुरवात झाली.
तथापि स्यांतही पुन्हां एक निराळेच वैशिष्य आहे. हिंदुस्थानांतील मुसलमानांत
शिया व सुनी हे दोन पंथ तर यावेळीं अस्तित्वात होतेच; परंतु त्यांतच तिसरा “सुफी
या नावाचा एक पंथ इराजांत निर्माण होऊन त्याची हिंदुस्थानांत मोठ्या सगळ्याने वाढ
होत चालली होती. या धर्माची उत्पत्ति मूळ इरागांत झाली असल्यानें पारशी लोकांकडून
सूर्य व अमि यांची उगसना ह्या पंथांतील लोकांनी स्वीकारिली होती. अर्थात् हिंदुस्थानांत
या काळात, शिवा, सुनी व सुफी असे मुसलमानात तीन धार्मिक पंथ अस्तिरांत होते,
तथापि त्यापैकीं सुनी पंथाचें ह्यावेळी विशेष प्राचल्य होतें; आणि आपा येथील सुनीपंथीय
उलना मंडळी, शिवा व सुकी ह्या दोन्हींही पंथांचा द्वेष करीत असून त्या पंथांतील लोकांचा
छळ करीत होती; न्यायाच्या कामति अन्याय व पक्षपात करीत होती, त्यांच्या विरुद्ध अक
बराकडे सारख्या कामाच्या येऊ लागल्या होत्या; आणि उलमांचं वर्चस्व
हाणून पाडण्या-करिता अनेक मंडळींचे मोठ्या नेटानें प्रयत्न सुरू झाले होते.
शिवाय याच काळात, मुसलमानी धर्माच्या इतिहासातील एक भविष्य खरें
व्हावयाचें होतें, आणि ते खरे होणार असा जनतेचा समज होता. “इस्लामाचीं. एक हजार
वर्षे भरतांच जिकडे तिकडे धर्माची अवनति होईल; सर्वत्र हाहाःकार उडेल; परमेश्वरास