Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२६३)

भटके लोक, (६) इंग्रजांसिद्ध ज्यांनी बंडाची फूस दिली होती व त्यांचे जीव धोक्यांन घातले होते, असे जेसूईद लोक; ( ७ ) मोडकळीस आलेले माहीम, रिखें, वरळी, शींव, शिव व माजगांव वगैरे ठिकाणचे किले. ( 4 ) चाळीस हजार एकर त्यांपैकी अंशत: समुद्रांत बुडालेली जमीन. (९) डोंगरीच्या टेकडीवरील आणि परेळ, माहीम, वरळी व माजगांव वगैरे ठिकाणी असलेली थोडीशी कोळ्यांची झोंपडीं. (१०) परळी आणि शींव यामधील मोडकळीस आलेला बांध. (११) जिवाला अपाय व जिवाचा नाश करणारी रोगट हवा. (१२) मुबलक मच्छी व माशांची हाडे, यांशिवाय, मुंबईतील सर्व घरेदारें, जवाहीर, पैसाका आणि रोकड ४८७९ पौंड ७ शिलिंग ६ पेन्स, इतकें इंमजास आणखी जास्त मिळाले-यावरून मुंबईच्या तत्कालीन भिकार स्थितीची सहज कल्पना करितां येते.

 हिंदुस्थानात व्यापार करण्याला मोगल बादशहाच्या परवानगीची आवश्यकता- असल्याने इंग्रजांनी सुरत येथें वखार घालण्याची परवानगी मिळविण्याच्या पूर्वीही तसे प्रयत्न केले होते. इ० सन १५९९ मध्ये मिल्डन हॉल या नांवाच्या एका मनुष्यास इंग्लंड- मधून हिंदुस्थानांत अकबर बादशहाकडे व्यापारासंबंधीं बोलणें करण्याकरितां पाठविण्यांत मलें होतें व त्याजबरोबर एलीझाबेथ राणीनें अकबर बादशहास पत्रे दिली होती; त्या- प्रमाणे तो बादशहास भेटून तीन वर्षानी इंग्लंडमध्यें परत गेला; तथापि तो कारण नसत अनेक भानगडीत पडल्यामुळे त्याच्या इकडे येण्याच्या कांहींही उपयोग झाला नाहीं; पुढें इ० सन १६०० मध्ये कॅप्टन हॉकिन्स या नांवाचा एक मनुष्य हेक्टर जहाजावर हिंदुस्थानांत येऊन तो आग्रा येथें जहांगीर बादशहास भेटण्यास गेला; (इ० सन १६०९ ) त्यानें इंग्लंडचा राजा पहिला जेम्स याच्याकडून मोगल बादशहास पत्र आणिलें होते; त्याने जहांगीरची मर्जी संपादन करून, इंग्रज कंपनीनें सुरत येथें व्यापार करावा, अशी परवानगी मिळविली; जहांगीरने त्याचें एका ख्रिस्ती बाईशीं लम करून दिले व त्यास चारशे स्वारांची, ह्मणजे अट्ठेचाळीस हजार रुपये सालीना उत्पन्नाची मनसबी करून दिली. अशारीतीनें दोन वर्षे तो बादशहाजवळ राहिला, परंतु त्याचें व गुजराथचा सुभेदार मुकर्रबखान याचें वांकडे आले; हॅकिम्सने खानाविरुद्ध जहांगीरजवळ कागाळ्या केल्या; तेव्हां बादशहाने त्यास या येथे बोलावून घेऊन त्याच्यापासून सर्व संपत्ति हिसकावून घेतली व त्यास प्रतिबंधांत देविलें; तथापि त्यानें पैसे भरून लवकरच आपली सुटका करून घेतली; हॉकिन्सचा सूड घेण्याचा निश्चय केला; इंग्रजांना व्यापार करण्याची बंदी केल्यास आपण गोव्याहून हिरे- आणवून देतो, असे त्याने बादशहास कळविलें दुसरेही अमीर उमराव इंमजाविरुद्ध ओरड करू लागले व त्यांपैकी एकजण तर असे सुद्धां ह्मणाला की, " इंग्रजांना हिंदु- स्थानांत पाऊल ठेवू दिल्यास ते लवकरच सर्व देश बळकावून बसतील. " हे ऐकून