Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६० )

मिळाली होती; हणून त्या ठिकाणास " चेनाप्पा पट्टम् " असे नांव देण्यांत आलें, व " चिनाच्या पट्टम्, चेनापा पट्टम्, चिन्नापट्टम्, चन्नापट्टम् स्यावरूनच मद्रास शहरास किंवा नुसतें " पट्टनम् " असें नांव अद्यापि चालू आहे. मद्रासची वसाहत ही पूर्वी इंग्रज, ईस्टइंडिया कंपनीचें मुख्य ठाणें जें बंटाम त्याच्या देखरेखीखाली होती; परंतु इ० सन १६५३ पासून " मद्रास इलाखा " या नांवानें ती स्वतंत्र करण्यांत आली, इ० सन १६३८ मध्ये सुरत हैं इंग्रज कंपनीचें मुख्य ठाणे बनलें; आणि ३० सन १६४३ च्या सुमारापर्यंत मद्रास व मच्छलीपट्टण येथे इंग्रजांच्या व्यापाराचा चांगल्या रीतीनें जम बसला.

 याच सुमारास बंगालमधील व्यापाराकरितां हुगळी नदीच्या वरील भागावर इंग्रजांनी आपली एक वसार स्थापन केली आणि ३० सन १६५० मध्ये त्यांनी बादशहाच्या कामगाराकडून हुगळी येथें व्यापार करण्याचा परवाना मिळविला; शिवाय बाऊटन या नांवाच्या इंग्रज कंपनीच्या नोकरीतील एका शस्त्रवैद्याला याच काळाच्या सुमारास मोगल बादशाहाच्या दरबारी आपा येथें बादशहाला औषधोपचार करण्या- करिता पाठविण्यांत आलें होतें, त्याप्रमाणे त्याने तिकडे जाऊन बादशहास बरें केलें; त्यामुळे मोंगल दरबारांत इंग्रजांचें वजन बन्याच प्रमाणात वाढले व त्यांना कांहीं अधिक व्यापारी सवलती मिळून शिवाय बाऊटन यालाच बादशहानें आपल्या दरबारी राजवैद्य हणून ठेवून घेतले; व लवकरच इंपजांचा व्यापारी उत्कर्ष मोठ्या झपाट्यानें वृद्धि पावत जाण्यास प्रारंभ झाला.

 बादशहा आलमगीर ऊर्फ अवरंगझेब याच्या कारकीर्दीच्या सुरवातीच्या वेळेसच इंग्लंडति दुसऱ्या चार्लस राजाला पुन्हां गादीवर स्थापन करण्यांत आलें, त्यामुळे इंग्लंडच्या इतर देशाशी असलेल्या राजकीय संबंधांत पुष्कळच स्थित्यंतर होऊन इंग्रजांच्या व्यापारी पद्धतीवरही त्याचा बराच महत्त्वाचा परिणाम झाला; कंपनीस, राजाकडून अधिक व्यापक हक्क मिळावे, असें वाटत होते; उलटपक्षीं दुसऱ्या चार्लसला, कंपनी- जवळ असलेल्या सनदेमधून कामवेलचे नांव काढून टाकावयाचे होते, ह्मणजे परस्परांना आपआपले हेतु एकमेकांपासून साध्य करून घ्यावयाचे होते, ह्मणून उभयतांमधील उद्दिष्ट व्यवहार सहजच पूर्ततेस गेला. चार्लसने कंपनीस नवी सनद करून देऊन तिला ख्रिस्तीलोकांशिवाय इतरांबरोबर लढाई आणि तह करण्याला अधिकार दिला तथापि इंग्रज कंपनीचे खरे प्रतिस्पर्धी युरोपियन लोकच - पहिल्यानें पोर्तुगीज व डच व नंतर फ्रेंच - होते; यावेळी आशियाखंडांत आपले व्यापारी व राजकीय वर्चस्व पुन्ह प्रस्थापित करावें, आणि डच लोकांविरुद्ध इंग्रजांची मदत मिळवून त्यांच्याकडून होणारा