राज्यकत्यांना देण्यासाठी पहिल्या सफरीच्या मुख्यापाशी खालीलप्रमाणें एक विशेष महत्वाचें व मननीय पत्र दिलें होतें, तै:-
फेब्रुवारी इ० सन १६००
"परमेश्वररूपॅकरून इंग्लंड, फ्रान्स व ऐंलेंडची राणी इलिझाबेथ, हिजकडून ..चे थोर व पराक्रमी राज्यकर्ते...... यांस.
सर्वशक्तिमान् प्रभूनें आपल्या अपरिमित व अगाध शहाणपणानें व रूपादृष्टीनें या जगांत मनुष्याच्या उपभोगाकरितां अनेक उत्तम वस्तू उत्पन्न करून त्यांची सर्वत्र सुव्यवस्था करून ठेविली आहे. ते जिन्नस कोठेंही व कसेही मूळ पैदा झाले असले व
काहीं ह्या देशांत व कांहीं सा देशांत तयार झालेले असले तरी ते ह्या प्रभूच्या हुकुमानें पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांस पोचले जावे व त्याचें अपरिमित औदार्य सर्व जनांस सारखें प्राप्त व्हावें, असा त्या प्रभूचा उद्देश दिसतो; ज्या प्रदेशांत जो जिम्नस पिकेल, तेथच्या लोकांनी मात्र तो वापरावा, इतर देशांतील लोकांस तो मिळू नये, असा त्याचा हेतु दिसत नाहीं. एका देशानें दुसन्या देशाच्या उपयोगी पडावें व एका देशांत जो जिन्नस विपुल पिकतो, त्यानें दुसन्या देशाची गरज भागावी, असा ईश्वरी उद्देश असल्यामुळेच दूरदूरच्या अनेक देशांमध्यें व्यापाराची घडामोड चालते व मालाची "देवघेव चालल्यानें त्यांजमध्ये स्नेहभाव व प्रेम वाढत जाते."
"महाराज, ह्या वर सांगितलेल्या हेतुशिवाय आणखीं आह्मास असें समजले आहे कीं, कोणीही परराष्ट्राचे लोक व्यापाराचा उद्देश मनांत धरून स्नेहभावानें व सोम्यवृत्तीने आल्या देशांत गेले असता आपण त्यांचा उत्तमप्रकारें आदर करिता, यावरून आमच्या कित्येक व्यापा-यांस आपल्या देशांत जाण्याची परवानगी देण्यास आह्मास उमेद आली आहे. आपल्या देशांत व्यापारी मालाचा सौदा उत्तम होतो, असे इकडे खात्रीलायक कळल्यावरून जलमार्गाचीं अनेक दुर्धर संकटें सहन करूनही है. व्यापारी तिकडे जात आहेत. तेथे आपल्या लोकांशीं व्यापारी धोरणानें सौदा करावा,
णजे इकडचे जिन्नस त्यांस विकून तिकडचे इकडे विकत आणावे, असा त्यांचा उद्देश आहे. एवढीं संकटे सोसून आपल्या देशांत प्रवेश करण्याची ज्याअर्थी त्यां स्फूर्ति झाली आहे, त्याअर्थी आपणही त्यांचा योग्य परामर्ष घेतला असतां बोलण्या- चालण्यांत व व्यवहारति ते चोख व सभ्य आहेन, असे आपणास दिसून येईल व
आपल्या देशांत आल्याबद्दल आपणास वाईट वाटण्याचे कारण राहगार नाहीं. तसेच त्यांनीं आपल्या गलबतांतून नेलेला इकडचा माल आपणास देण्यांत व आपणाकडचा
इकडे आणण्यात एकमेकांचा निकट सहवास व व्यवहार घडल्यावर त्यांनी पुनरपि असाच माल घेऊन आपल्या देशांत यावें, असें आपणास वाटेल. आजपर्यंत फक्त