Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२८ )

काळापासून पश्चिमात्य राष्ट्रांस होती; मात्र पौर्वात्य राष्ट्रांस पाश्चिमात्य राष्ट्र प्रत्यक्ष माहीत नव्हती. व्यापाराची ने आण निरनिराळ्या राष्ट्रांच्या हातांत असल्यामुळे अमूक ठिकाणच्या अमूक एका जनसावरूनच एक राष्ट्र दुमन्यास ओळखीत असे. सुवेजच्या संयोगभूमीचा मध्येच अडथळा आल्यामुळे पूर्वसमुद्रावरील माल भूमध्य समुद्रावर उतरण्यास दोन मार्ग होते. एक इराणच्या आखातांतून वर जाऊन पुढे जमीनीवरून युफ्रेटीस नदीच्या काठानें आशियामायनरमधून जाई; आणि दुसरा तांबड्या समुद्राच्या उत्तर किनान्यावर उतरून जमीनीवरून मिसरदेशांतून भूमध्यसमुद्रांन उतरे, पण ह्याशिवाय अगदी उत्तरेकडचा एक तिसरा मार्ग होता. हा हिंदुस्थानच्या उत्तरेकडून निघून मध्य आशियांतील ऑक्सस ऊर्फ अमुदाय नया कांठानें कास्पियन समुद्रावरून काळ्या समुद्रावर उतरे. ह्याचे कास्पियन समुद्राच्या उत्तरेकडून व दक्षिणेकडून असे दोन फांटे होते. ते दोन्ही काळ्या समुद्रावर एकत्र होत. ह्यांपैकी आशियामायनरमधून जाणारा मधला रस्ता अगदीं प्राचीन होय. हिंदुस्थानची जहाजें किना-या किनान्याने इराणच्या आखाताच्या उत्तर टोकांशी जाऊन तेथील बंदरांत हिंदुस्थानांतला माल विकीत; युफ्रेटीस नदीच्या मुखाजवळच्या प्रदेशास प्राचीनकाळी खाल्डिया हैं नांव होते. खाल्डियाच्या बंदरांत तो माल भरून उंटाचे तांडे उत्तरेस जाऊन मग वाळवंटांतून पश्चिमेस वळून पालमीरा ऊर्फ ताडमूर येथें येत. तेथून ते पुढे नैऋत्येस डमास्कस येथें उत्तरत. डमास्कस येथें त्यास दोन फांटे फुटत. एक समोर पश्चिम समुद्रकिनान्यावर जाई. त्यावर टायर, सिडोन, एकर, अस्कालन वगैरे प्राचीन शहरें होतीं. दुसरा दक्षिणेकडे वळून पॉलेस्टाईनच्या किनान्याने इडोमप्रांतांतून मिसरदेशांत शिरे; आणि तेथें तांबडा समुद्रावरील रस्त्याची व ह्याची भेट होई. प्राचीनकाळच्या व्यापाराचा मुख्य रस्ता हा मधला होय. " ( बि० रि० पान ४-५ पहा. ) रोमन लोकांचें आरमार अरब लोकांना हुसकावून लावण्यास समर्थ नव्हतें, आणि हिंदुस्थानच्या पश्चिम किनान्यावर व पूर्वेकडील देशाशी चालणारा युरोपियन लोकांचा समुद्रावरील व्यापार इजिप्त, सुएझ, एडन या मार्गाने हिंदी महासागरांतून जलमार्गाने होत होता. हा व्यापार पाल्मिरा येथील सधन व धाडशी व्यापारी खुष्कीच्या मार्गानें इराणी आखातातून युक्रेनीस नदीच्या मुखातून वर सीरियापर्यंत नेण्याचा प्रयत्न करूं लागल्यामुळे त्यांचे व रोमन लोकांचें अतीशय वांकडें येऊन पाल्मिरा शहराचा नाश होण्यास तेंही एक प्रमुख कारण होऊन बसलें.

 आरबलोकांसंबंधी मार्गे माहिती दिलेली असल्याने अगदी थोडक्यांतच त्यांच्या संबंध विषयानुरोधाने याठिकाणीं खुलासा करणे आवश्यक आहे. अरब मुसलमान हे प्राचीन काळापासून अरबस्थानांतील रहिवासी आहेत. महंमद पैगंबरासारखा कर्तृत्ववान् पुढारी मिळेपर्यंत त्यांची फारशी प्रसिद्धी झाली नाहीं व आपल्या देशाबाहेरही ते फारसे