Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२१०)

आणि उभयतांमध्ये तह होऊन दोघांनी मिळून मुसलमानी धर्माची वृद्धि करावी, असे ठरले; परंतु महंमदशहा व कुंभराणा यांचें सख्य असल्यामुळे हा तह पुढें अमलांत आला नाहीं; तथापि महंमदशहानें वर्चस्व प्राप्तीकरिता त्यानें आसपासच्या रजपूत राज्य- कर्त्यांशी अनेक युद्धप्रसंग करून अजमीर व रतनभोर येथील राज्यकर्त्यांस जिंकिलें, ( इ० सन १४५५) व त्यांच्याकडून खंडणी मिळवून तो राजधानीत परत आला.

 पुढे सहाच वर्षांनीं, इ० सन १४६१ मध्ये बहामनी सुलतान हुमायूनशहा हा मृत्यू पावला; व त्याचा आठ वर्षांचा मुलगा निजामशहा हा गादीवर आला व तो अज्ञान असल्यामुळे त्याची आई, बहामनी राज्याचा प्रसिद्ध वजीर खाजेखान महंमद- गवान याच्या मदतीने राज्यकारभार चालवू लागली, ही संधी साधून माळव्याचा सुलतान महंमदशहा यानें बहामनी राज्यावर स्वारी केली; व इलीचपूरचा परगणा आपल्या ताब्यांत घेतला; त्यावेळी बहामनी सैन्याने त्याच्याशी युद्ध केलें; परंतु शिकंदरखान तुर्क या नांवाच्या एका सरदारच्या मित्रेपणामुळे बहामनी सैन्याचा पराभव झाला; आणि निजाम- शहा आपली राजधानी बेदर येथें पळून गेला; तेव्हां महंमदशहानें त्याचा पाठलाग करून बेदर शहर आपल्या ताब्यात घेतले; इतक्यांत निजामशहास गुजराथचा सुलतान महमूद बेगडा याने मदत देऊन माळवा प्रांतांत फौज पाठवून महंमदशहास शह देऊन यास बेदरचा वेढा उठवून माळवा प्रांती परत जाण्यास भाग पाडिलें; आणि तो परत आल्यावर बहामनी सैन्यानें मार्गात त्यास इतके जेरीस आणिलें कीं, अत्यंत कष्टानेच तो कप्तायसा एकदांचा आपल्या राज्यांत सुरक्षीतपणे परत आला. तो इ० सन १४६९ यावर्षी मृत्यू पावला, आणि त्याचा मुलगा ग्यासुद्दीन हा त्याच्या मागून गादीवर आला.

 सुलतान महंमदशहा यानें आपल्या कारकीर्दीत अनेक युद्धे केली; तरी पण राज्यकारभारात कोणतेही घोटाळे न माजता अंतर्व्यवस्थेची योग्य तजवीज रहावी हणून स्थानें अतीशय काळजी घेतली होती; शिवाय जरी त्याच्या परराज्यांवरील स्वान्यांमुळे रयतेत त्या त्या वेळीं त्रास भोगावा लागत असे तरी तो धर्मवेडा अथवा हिंदूधर्मद्वेष्टा नसल्यानें त्याच्यापासून हिंदूप्रजेस त्रास झाला नाहीं. त्यानें आपलें राज- धानीचे ठिकाण मांडवगड येथें अनेक इमारती बांधून त्या शहरास शोभा आणिली; आणि हुशंगशहाच्या वेळीं सुरू झालेली भव्य मशीद त्यानें पूर्णतेस नेली. थोडक्यांत झणजे महंमदशहाही मोठा शूर, दुबार व कर्तव्यदक्ष राज्यकर्ता होऊन गेला, असें ह्मणण्यास हरकत नाहीं.