२ माळवा - दक्षिणहिंदुस्थान व उत्तरहिंदुस्थान यांना विभागणारी रेषा,
ढोबळ मानाने पाहता, नर्मदा नदी ही आहे व तिच्या पलीकडे माळवाप्रति आहे. या
प्रांताच्या पूर्वेस बुंदेलखंड, पश्चिनेस गुजराथ, दक्षिणेस नर्मदा नदी, आणि उत्तरेस
चंचळा नदी असून पंचमहाल जिल्ह्यांतील दोहन ही गुजराथची पश्चिम व माळव्याची
पूर्व सरहद्द आहे आणि हा प्रदेश नर्मदा, चंचळा, चटवा, क्षिप्रा वगैरे नद्यांनी व्याप्त
असून त्यातील बहुतेक जमीन सुपीक आहे. हा प्रदेश इ० सन १३२६ मध्ये मुसल-
मानांच्या ताब्यांत गेला, या वर्षी गुलाम. वंशातील राज्यकर्ता सुलनान शम्सउद्दीन अल्तमश
( कारकीर्द ३० सन १२१० ते १२३५ ) यानें माळवा प्रांतावर स्वारी करून मांडव-
गडचा प्रसिद्ध किल्ला आपल्या हस्तगत करून घेतला आणि पुढें इ० सन १३३१ मध्ये
त्याने मालेरे व उज्जयनी हीं दोन प्रसिद्ध ठिकाणें आपल्या ताब्यांत घेऊन उज्जयनी
येथील सर्व देवालयांचा त्याने विध्वस उडविला; व याच काळापासून माळवा प्रांतांत
मुसलमानांचे ठाणे बसून त्या प्रांताची व्यवस्था दिल्लीदरबारांतून होऊं लागून ती
फिरोज तुष्लकच्या कारकीर्दीच्या ( कारकीर्द इ० सन १३५१ ते इ० सन १३८८ )
अखेरीपर्यंत टिकली; परंतु त्यानंतर दिल्लीस सारखे घोटाळे माजले; ग्यासुद्दीन, नंतर
अबूबकर, व त्यानंतर महंमदशहा, अशी राज्यकर्त्यांची उलटापालट झाली; आणि महम-
दशाही राज्यावर आल्यावर चारच वर्षात ( इ० सन १३९४ मध्ये मृत्यू पावून
त्याचा मुलगा हुमायून ऊर्क शिकंदर हा गादीवर आला, पण तोही एकाएकी मृत्यू
पावला; व महंमदशहाचा दुसरा मुलगा महंमूद हा गादीवर आला, ह्मणजे फिरोजच्या
मृत्यूनंतर दिल्ली येथें सारखी अव्यवस्था माजत चालली होती, आणि मध्यवर्ती सत्ता पूर्णप
कमजोर होऊन, धाडसी व शूर सरदार-मंडळी आपआपली स्वतंत्र राज्य निर्माण
टीप १: - मांडवगड है पुरातन ओसाड शहर हलीं धार संस्थानति असून
सर्व येथील किल्ल्या इतको पुरातन व मेजबूत किल्ला दुसरा नाहीं; है
ठिकाण नर्मदा नदीच्या पूर्व कांठावर उतरेस १५ मैलांवर, महू पासून 30 धार पासून
२० व इंदूर पासून ३८ मैलांवर आहे. हे निर्जन शहर समुद्रसपाटी पासून १९४४ फूट
उंचीवर असून त्याशहराची व्याप्ति आठ मैलांची आहे; हे ठिकाण विध्यपर्वताच्या ओळीस
लागलेले असून माळवा प्रांताच्या मुसलमान राज्यकर्त्यांची याठिकाणी राजधानी होती.
माळव्याचा सुलतान हुरंगशहा घोरी याने मांडवगडचा किल्ला उत्लष्टरीतीने बांधून
मजबूत केला; शिवाय त्यानें बाँधिलेली संगमरवरी दंगडांची जुम्मामशीद, बाजबहादूर
याने बांधलेला राजवाडा, वगैरे प्रेक्षणीय स्थळे, तेथें पूर्ववैभवाचे अवशेष ह्मणून आज
तागायत अस्तित्वात आहेत.