बहादूरशहा मृत्यू पावला, त्यावेळीं तो ७१ वर्षांचा होता, ह्मणजे आपल्या वयाच्या ६१ व्या वर्षी नो गादीवर आला, हॅ उघडच होते; तथापि साठी उलटल्यावर तो राज्यावर आला असूनही त्याने जे अनेक कष्टाचे युद्धप्रसंग केले, ज्या अनेक स्वाया केल्या, अविश्रांत परिश्रम घेतले व जी कर्तबगारी दाखविली, त्यावरून त्याची असाधारण योग्यता निदर्शनास येते.
बहादूरशहा अशा अकल्पित रीतीनें मृत्यू पावल्यावर दरबारच्या मंडळीनी त्याचा पुतण्या त्याचा भाऊ लनीचखान याचा अज्ञान, अकरा वर्षीचा मुलगा महंमदशहा (दुसरा) यास गादीवर बसविले व इमाद-उल-मुल्क व दर्याखान हे दोन सरदार राज्य- कारभार चालवू लागले; परंतु या उभयतांमध्ये वैमनस्य उत्पन्न होऊन इ० स० १५४४ पर्यंत त्यांचे आपसांत तंटे चालूच होते; परंतु त्यानंतर शही वयांत आलेला असल्यानें, त्यानें आपल्या हाती राज्यकारभार घेतला व बुन्हाण उल-मुल्कू बाबी या हुषार सरदा राच्या - वजिराच्या मदतीनें व आलमखान लोदी यास सेनापति नेमून त्याच्याही सल्ल्यानें तो काम पाहूं लाला; तथापि दुर्दैवाने या शहाची कारकीर्द हिंदू व रजपूत लोकांना अती- शय नुकसानकारक झाली. त्यानें बुन्हाणच्या अनुमतीनें अनेक जहागिरदारांची उत्पन्नें मरामर खालसा केली; त्यामुळे सर्वत्र असंतोष उत्पन्न होऊन शिरोही, डोंगरपूर, इडर, लुनावाडा, राजपिंपळा, महीकांठा, झालावाड वगैरे ठिकाणच्या लोकांनी बंडे केली; तेव्हा त्याचे निर्मूलन करण्याकरितां सुलतानाने एकसारखें शस्त्र चालविले; त्यामुळे हिंदू लोकांवर अतीशय जुलूम होऊन त्यांच्या वस्तींत दारिद्र्य, माजून सर्वत्र निरुत्साह व उदासीनता दिसूं लागली व राजा आणि प्रजा यांच्यामधील प्रेमभाव नष्ट होऊन ते एकमेकांचे शत्रू बनले.
याचवेळी महंमदशहाचा सल्ला मसलतगार माफीसखान यानें, शहा दारूच्या धुंदीत असता त्याच्याकडून परवानगी घेऊन अल्लाउद्दीन लोदी - हा दिल्ली येथील प्रसिद्ध शिकंदर लोदी याचा भाऊ असून तो बहादूरशहाच्या वेळीं गुजराथेंत येऊन त्याच्या नोकरीत राहिला होता: सुलतानखान या दोघां सरदारांस विनाकारण ठार मारिलें; त्यावरून कांहीं सरदारौत आप्रसति वैमनस्य येऊन जोराचें भांडण सुरू झाले; व विकोपास जाऊन इमाद उलमुल्क या नांवाचा एक सरदार मारला गेला, आणि पुढे लवकरच (इ० सन १५५४ मध्ये ) वजीर बु-हाण उल्मुल्क यानें महमूदशहाचा खून करून स्वतः सुलतानपद बळकाविलें; परंतु त्याचा बलिष्ट प्रतिस्पर्धी शिवानखान याने त्याच्या युद्ध केलें; व ज्यांत विजयी होऊन त्याने बुन्हा यास ठार मारिलें.