Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२०१)

स्याला दींवकडे तिकडील अव्यवस्था मोडून टाकण्याकरितां जावयाचें होनें, परंतु त्याने पदभ्रष्ट केलेला त्याचा धाकटा भाऊ महंमूद हा जिवंत असून त्याच्या पक्षाचे लोक बंडावा करीत होते; ह्मणून त्याने महंमुदास - या एकट्याच प्रतिस्पर्धी वारसदारास- विषप्रयोग करून ठार मारिलें; व नंतर तो दींव येथें गेला; व तेथील बंदोबस्त करून जुनागड, संचायत वगैरे ठिकाणी स्वतः जाऊन आपला तिकडील अंमल कायम केला; दक्षिणेवर स्वारी करून अहंमदनगर व दुसरीं कहीं शहरें लुटिलों व तसाच पुढे माळव्यावर चाल करून गेला. त्यावेळी महंमूद खिलजी हा आपल्या साही मुलासह त्यास शरण आला; तेव्हां बहादूरशहाने त्यांना कैद करून अहंमदाबाद येथे पाठविले; परंतु मार्गातच खिलजीच्या तर्फे बंडावा झाला, त्यामुळे त्यांच्या बरोबरील सरदारांनी त्यांना ठार मारिलें व माळव्याचे स्वतंत्र राज्य नष्ट झालें.

 या विजयानंतर बहादूरशहा है। उज्जयनी शहरावर चाल करून गेला; तेथील राज्यकर्ता शिलादित्य झास केंद करून दर्यासान मंडवी या नांवाच्या एका सरदारास तेथें आपल्यातर्फे कारभार पाहण्यास ठेविलें; व रायसीन येथे शिलादित्त्याचा भाऊ लक्ष्मणसिंह हा राज्यकर्ता होता, त्याच्यावर त्याने स्वारी केली. यावेळी त्याच्या स्वारीबरोबर शिलादिस्य होता, त्यानें “ मी माझ्या भावास आपणांजवळ घेऊन येतों;" असें शहास वचन दिलें; तेव्हां शहाने त्यास प्रतिबंधांतून मुक्त केले व तो रायसीन येथे आपल्या भावाकडे गेला. नंतर या उपयनांचं चितोडच्या राण्याची मदत मिळविली; आणि ते शहाच्या हातून निसटून चितोड येथे सुरक्षीत पोहोचले. इकडे शहानें रायसेनचा किल्ला व शहर आपल्या ताब्यात घेत; व इस्लामाबाद, दुशंगाबाद वगैरे शहरे आपल्या हस्तगत करून घेऊन तिकडे त्याने आपला अंमल बसविला.

 त्यानंतर बहादूरशाहा हा चांपानेरकडे येत असता, त्यास, पोर्तुगीज लोकांनीं कित्येक मालांनी भरलेली जहाजें दींव बंदरांत आणिली आहेत." अशी बातमी मिळाली, ह्मणून तो तसाच संचायत येथे गेला; परंतु शहा दींव बंदरावर चाल करून येत आहे, अशी बातमी मिळाल्याचरोचर पोर्तुगीज जहाजें तेथून निघून गेलीं; नंतर शहा अहंमदाबाद येथे परत येऊन, तेथून त्याने चितोडगडावर स्वारी केली. तेथील राजा विक्रमाजीत याचा पराभव केला. त्याच्या जवळून मौल्यवान् नजराणे व खंडणी घेतली; आणि तेथील वेढा उठवून तो अहंमदनगर येथे परत आला.

 अशारीतीनें बहादूरशहा हा दिवसेंदिवस प्रबळ होत चालला होता आणि तो आणखीही प्रगळ झाला असता; परंतु त्यानें मोंगल बादशहा हुमायून याच्या आज्ञेषी
२६