Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९९ )

आणि त्याच कबरीशेजारी आपलीही तयार झालेली कबर त्यानें पाहिली; व अखेरच्या वेळी त्याला आपल्या एकंदर आयुष्यक्रमांत केलेल्या अनेक गोष्टींचे व कठोर रुत्यांचे स्वरण होऊन पश्चातापाने त्यास रडूं कोसळले. असेंच आहे; असेंच व्हावयाचे पापांचा- कठोर त्यांचा असाच पश्चात्ताप होतो, हा सिद्धांत आहे.

 महमदशहा हा तिकडून परत आल्यानंतर लागलींच आजारी पडला; व सतत तीन महिने त्याच स्थितीत राहिला, आपल्या अंतकाळी आपला मुलगा जवळ असावा अशी त्यास इच्छा झाली; त्याप्रमाणे शहाजादा खलील यास त्याने बडोदें येथून आपणां- जवळ बोलावून घेतले; आणि त्यानंतर लवकरच त्याचा इहलोकींचा आयुष्यक्रम समाप्त झाला.

 महमूदशहानंतर त्याचा मुलगा- खलील हा मुज्झशहा है नवि धारण करून गादीवर आला, या काळांत माळवा प्रांतावर सुलतान महंमद खिलजी हा राज्य करीत होता; परंतु यावेळी तो निव्वळ नांवाचा राजा असून सर्व राजसत्ता त्याचा हिंदू प्रधान मेदिनीराय याने बळकाविली होती; ह्मणून त्या प्रधानाचा नाश करून सर्व सत्ता आपल्या हाती परत मिळविण्याच्या उद्देशाने खिलजीनें मुज्करशहाजवळ मदत मागितली ती देण्याचे त्याने कबूल करून आणि पाटणचा सुभेदार ऐन उलमुल्क यास अहमदाबाद येथे बोलावून घेऊन आपल्या कारभारावर स्थानापन्न करून तो स्वत: खिल-जीच्या मदतीस माळव्यांत गेला; ही संधी साधून इडरचा राज्यकर्ता भीमदेव यानें पुंडाई आरंभिली; तेव्हां शहाने परत येऊन त्याचा पराजय केला; इडर शहराचा विध्वंस उड- विला; व भीमदेवास आपल्या वर्चस्वाच्या आधीन होणे भाग पाडिलें. त्यानंतर भीमदेव हा लौकरच मृत्यू पावला; व भारमल्ल हा गादीवर आला; परंतु त्यास रायमल या नांवाचा एक प्रतीस्पर्धी असून या उभयतांमध्ये राज्यप्राप्तीकरितां भांडण सुरूं झालें. त्यावेळी भारमलचा पक्ष मुज्झरशहा यानें उचलिला, आणि रायमल हा प्रसिद्ध राणा संग याचा जावई असल्यामुळे, त्याने रायमल्लास मदत केली व उभयतांमध्ये पुष्कळ काळपर्यंत युद्ध चालून मुरशहा - भारमल हा पक्ष विजयी झाला; भारमल्ल हा इडरचा वारस ठरला; व त्यानंतर रायमल्ल हा आजारी पडून लवकरच मृत्यू पावल्यामुळे तर भारमल हा बिनहरकतच इडरच्या गादीवर स्थाईक झाला.

 या काळांत मलिक नुसस्तू उलमुल्फ् या नांवाचा शहातर्फे एक ठाणेदार इडर येथे रहात होता, हा मनुष्य मोठा अधिकप्रसंगी व खाजवून खरूज काढणारा उपद्व्यापी होता, बहादूरशहाचा समकालीन मेवाडचा प्रसिद्ध राणा संग याची कीर्ति व लौकिक त्या प्रांतांतही पुष्कळ पसरलेला असून सर्व लोक त्याच्या नांवाचाही अतिशय