Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९६ )

 कुल्बूशहानंतर स्थाचा चुलत भाऊ दाउदलान हा गादीवर आला, परंतु एक महिना, दहा दिवसांतच तो राज्य चालविण्यास नालायक ठरून त्यास पदभ्रष्ट करण्यांत आले आणि १. स्याचा १४ वर्षांचा सावत्र भाऊ महमूद यास त्याच्या ऐवजी गादीवर


सुलतानांनी त्याच्यावर स्वारी केली, तीत त्यानें त्या उभयतांचा पराभव करून (३०. सन १४४० मध्ये) माळव्याचा सुलतान महंमद खिलजी यास युद्धांत पकडून चितोड येथें ने; परंतु पुढे सहा महिन्यांनीं स्याजकडून खंडणी वगैरे न घेता मोठ्या सन्मानाने व्यास आपल्या राजधानीत परत पाठविलें. मेवाडच्या संरक्षणाकरिता जे एकंदर २८४ किल्ले बांधण्यात आले. त्यातील ३२. किल्ले ह्या कुंभराण्याने एकट्यानें बांधिलेले आहेत; आणि त्यातील कुंभोमेर अथवा कुंभे (अथवा कुमळनेर - येथील किल्ला तर अतीशय मजबूत असून त्याच्या अतीशय आवडीचा होता व तेथेही तो कधीं कधीं रहात असे. या राण्यानें राज्य व धर्म या उभयतांचीही वृद्धी केली; तो स्वतः कवी असून विद्येचा मोका व भक्त होता. त्याची प्रिय भार्या परम कृष्णभक्त साध्वी मिराबाई - मोटच्या ठाकूरची गुणशीलवती पवित्र व पूज्य कन्या मिराबाई ही कवयेत्री असून तिची प भक्तिरसप्रधान व प्रेमळ आहेत व तिच्या प्रत्येक पदाच्या शेवटी " मीराके प्रभु गिरिधर नागर " हा चरण येत असतो. कुंमोनें झालावाडची असाधारण सौंदर्यसंपन्न राज्यकन्या झालिनी हिच्या बाबतीत जे अयोग्य वर्तन केले, तें त्याची परम सात्विक राणी मिराबाई हिला न आडवून ती द्वारका येथे गेली; व तेथेच भगवद्भजनांत व श्रीकृष्ण-ध्यानति मम होऊन शेवटी त्याच ठिकाणीं तिचा अंत झाला. मिराबाईचा मठ अजून द्वारकेस प्रसिद्ध आजतागायत या साची कीर्ति गुजराथेंत ऐकण्यांत येते.

 पराक्रमी राणा कुंभ यानें पन्नास वर्षे राज्य केलें व अनेक पराक्रमाची हत्ये करून त्याने अतीशय लौकिक संपादन केला; आणखीही काही वर्षे तो राज्य करिता, पण - पण त्याचा विलक्षण महत्वाकांक्षी, अतीशय उतावळा, मनस्वी बावळा, अता दिग्विजयी चिरंजीव उदयसिंग याने राज्यलोभानें व्यास - आपल्या बापास-ठार- मारिलें आणि आपण राज्याधिकारी बनला 11 या पितृघातकी पोरास स्पाच्या या, अति निंय, अतिशय घोर, अत्यंत अधम, अपवादक नीच कृतीवरून त्यास " इस्मारी - हणजे हत्या करणारा, अथवा मारेकरी या निंदाब्वजक नावाने ओळखीत असत व त्याचा -लेस करीत असत. उदेसिंग- उदयसिंग हा अतिशय मूर्ख, नेभळा, नाळायक व नादान असून त्याने अनेक / अयोग्य रुत्ये केली, त्यामुळे तो अतीशय अमीय होत चालला होता; पण इतक्यांतच त्याच्यावर वीज पडून तो जागच्याजागी ठार झाला; व त्यामुळे स्मारमा माड़ी लीलांचा ग्रंथ, तेथेंच समाप्त झाला.