कुत्यूशाहा याचे राज्यारोहण; पान १०१; तो मदनपंत ऊर्फ मादाण्णा यास आपला
मुख्य प्रधान नेमितो; पान १०१; त्यामुळे राज्यांतील मुसलमान सरदार मंडळींना राग
येतो. अवरंगसेच दक्षिणांतावर स्वारी करतो, मोंगल सैन्य गोवळकोडे येथील किल्ल्यास
वेढा घालतें; शहाचा नाइलाज होऊन तो अवरंगझेचाशी तह करतो, पान १०२;
तहाची निष्फलता, अवरंगतेच पुन्हां कुत्यूशाही राज्यावर स्वारी करून ते राज्य नष्ट
करतो; पान १०२ - १०५; अहंमदनगर येथील निजामशाही राज्यस्थापनेची हकीकत
पान १०५-१०७; अहंमद निजामशहा स्वतंत्र होतो. पान १०७; त्याची कारकीर्द,
मृत्यू; बुन्हाण निजामशाहा गादीवर येतो; पान १०८, कंचरसेन मुख्यप्रधान होतो; पान
१०८, निजामशहाची कारकीर्द व मृत्यू; पान १०९, हुसेन निजामशहा गादीवर येतो;
विजयानगरकर रामराजाविरुद्ध मुसलमान राज्यकर्त्यांची जूट होऊन युद्ध होते व त्यांत
रामराजाचा नाश होतो; व विजयानगरच्या राज्याचा शेवट होतो; पान १०९;
हुसेनशाहाचा मृत्यू, त्याचा अज्ञान मुलगा मुर्तुजा निजामशाहा गादीवर येतो; पान
११०; प्रसिद्ध चांदधिची हिची हकीकत; ती स्वतः राज्यकारभार चालविते, तिच्या
कारकीर्दीत घडलेल्या महत्वाच्या गोष्टीं; ती मोंगल सैन्याबरोबर युद्ध करते; मृत्यू,
योग्यता; पान १११-१२०; मिआन राजू व मलिकंबर हे उभयता निजामशाही राज्याचा
कारभार चालावतात; पान १२०; मलिकंचर मोगली सैन्यावर हल्ला करून त्या सैन्याचा
पराभव करतो; पान १२०-१२१; मिआन राजू व मलिंकंबर यांच्यामध्ये युद्ध होतें,
राजचा पराभव होतो; पान १२१, निजामशाही राज्याची तत्कालीन स्थिति; मलिकंचरचें
पूर्ववृत्त; पान १२२; राजा तोडरमल याची नवी जमाबंदी पद्धत; व तिचे अनु
करून मलिकंचर यानें दक्षिणेत नवीन जमाबंदीची व्यवस्था केली, त्यासंबंधी विवेचन;
राजा तोडरमल याचे पूर्ववृत; पान १२२-१३०; मलिकंबर गुजराथचा सुभेदार
अबदुल्लाखान याचा पराभव करतो; पान १३०; मोंगल बादशाहा जहाँगीर याच्या
हुकमानें शहाजाद। खुर्रम ऊर्फ शहाजहान दक्षिणांतावर स्वारी करतो; मलिकंबर त्यास
शरण जाऊन तह करतो, पान १३० - १३१; मलिकंचरचा मृत्यू; त्याची योग्यता; पान
१३१--१३२ मलिकंबरचा वडील मुलगा फत्तेखान हा निजामशाही राज्याचा सूत्रचालक
होतो; पान १३२, तो मोंगलाशीं सरूप करतो; पान १३२; मूर्तुजा निजामशाहा त्यास
वजीरीपदावरून दूर करून सीवरच्या किल्लयांत प्रतिबंधांन ठेवितो; पान 933; लुकजी
जाधवराव याची व त्याच्या घराण्याची पूर्व हकीकत, पान १३३; लुकजी जाधवराव
मोंगलांस मिळतो; तो निजामशहाच्या भेटीस येतो; शाहा त्यात दग्यानें ठार मारतो;
पान १३५ - १३६; जाधव घराणे; मोंगलाच्या नौकरीत राहतें पान १३६; शहाजी
निजामशाहीचा संबंध सोडून स्वतंत्र होतो; आदिलशाहा हा शहाजीवर भापला सरदार
पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[७]