१ गुजराथः - हिंदुस्थानच्या पाश्र्चमेकडील प्रदेशास " गुर्जरदेश " अथवा गुजराथ असें गतात. त्यांत " सौराष्ट्र " किंवा काठेवाड, आणि गुजराथ असे दोन भाग असून, कच्छच्या रणापासून संचायतच्या आखातापर्यंतच्या प्रदेशास काटेवाड अर्से ह्मणतात; तथापि अहंमदाबाद, खेडा, पंचमहाल, भडोच, सुरत हे जिल्हे, गायकवाडचें राज्य, कच्छ, संचायत, पालनपूर वगैरे संस्थानें, काठेवाड, महीकांना, खाकांठा ( रेवा ह्मणजे नर्मदा नदी ; ह्मणजे मही व नर्मदा या नयांच्या कांटचा प्रदेश ) खडा, सुरत वगैरे जिल्ह्यांतील संस्थानें, वगैरे सर्व प्रदेशाचा गुजराथ " या सर्वसाधारण व्याख्येमध्ये समावेश होतो. या प्रदेशाच्या पूर्वेस मेवाड, माळवा व खानदेश, पश्चिमस अरबी समुद्र, दक्षिणेस संचायतचें आखात व ठाणे जिल्हा, आणि उत्तरेस कच्छचें रण, आखात व मारवाड प्रांत आहे. या प्रदेशांत नर्मदा, तापी, मही, साबरमती वगैरे मोठ्या नया वहात असून हा सर्व प्रदेश बहुतेक सपाट, सुपीक, सधन व समृद्ध आहे; त्यामुळे प्राचीन हिंदू राज्यांच्या काळाप्रमाणेच मुसलमानी अमदानीतही त्याचें महत्व तसेंच कायम राहिले आहे.
बादशहा अल्लाउद्दीन खिलजी यानें गुजराथ प्रांतांतील बराच प्रदेश हस्तगत करून घेऊन, आपणांतर्फे आलबान या नांवाच्या एका सरदारास त्या प्रदेशाचा सुभेदार नेमिलें; तथापेि सर्व गुजराथ यावेळी त्याच्या हाती न येता अद्यापि पुष्कळ प्रदेश हिंदू राज्यकर्त्यांच्या अमलाखाली होता; आणि साबरमती नदीच्या पश्चिमेकडील विस्तृत प्रदेशांवर वाघेल, उत्तरेकडील डोंगरी प्रदेशांवर परमार व राठोड, कच्छचें रण व संचायतचे आखात या प्रदेशांवर झाला, आणि पावनगड व त्याच्या पूर्वेकडील प्रदेश, यांवर गार, या वंशांतील राज्यकर्त्यांचा अंमल होता. अल्लाउद्दीनच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा व्यसनी, विषयी, अनीतिमान् व नटव्यासारखा सजून कसाचिणीबरोबर बब्या लोकांच्या घरी नाचावयास जाणारा, असा त्याचा हलकट मुलगा - मुचारिक हा गादीवर आला. त्याने कमालुद्दिनखान या नांवाच्या एका सरदारास फौजेसह गुजराथचा बंदोबस्त करण्यास पाठविलें व लवकरच ऐनउल्मुल्क मुलतानी या नांवाच्या दुसन्या एका सरदाराची, त्यास मदत ह्मणून तिकडे रवानगी केली; परंतु तिकडील पुंडावा मोडीत असतो कमालुद्दीन मारला गेला; तरी ऐनउलमुल्क याने कसाबसा व काहीसा गुजराथचा बंदोबस्त केला. इतक्यांत मुबारिक यानें आपला सासरा मलिक दिनार यास " जाफर-