करून शिवाजीचा नाश करण्याचा प्रयत्न केला; लखन सोबत इ० सन १६७५ मध्ये मृत्यू पावला, स्थानें आपलें स्वातंत्रय कायम ठेवण्याकरिता अनेक पराक्रम गाजविले, आणि स्वतःच्या नांवाचे नाणेही पाडिलें होते; शिवाजीच्या मृत्यूनंतर मोगलांनी कोंकण प्रांतावर स्वारी केली; शिवाय कुडाळचे मूळचे मालक प्रभू देशमूख हेही सांवताविरुद्ध आपली सत्ता पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करूं लागले; तेव्हां या घराण्यांतील प्रमुख पुरुष आणि फोंड सांवत ( इ० सन १६४१-१६५१ ) याचा मुलगा दुसरा खेमसवित ( ६० सन १६७५- १७०९ ) यानें अवरंगझेबाचा आश्रय घेतला व त्याजकडून देशमुखीची सनद मिळविली. त्यानें इ० सन १६९७ मध्ये कुडाळकर प्रभू देशमुखांच्या सत्तेचा संपूर्ण नाश करून कुडाळ- प्रति हस्तगत करून घेतला. या प्रभू घराण्यापैकी एका पुरुषानें पुढें इ० सन १७५६ मध्ये बाळाजी बाजीराव पेशव्याची मदत घेऊन कुडाळ प्रति परत मिळविण्याचा प्रयत्न केला होता; परंतु तो सिद्धीस गेला नाही. राजारामाच्या मृत्यूनंतर सेमसविता पहिल्याने ताराबाईस व नंतर शाहूस मिळाला व शाहूचें स्वामित्व मान्य करून त्याने कुडाळ प्रांताशिवाय निम्मा साळसी महाल शाहूकडून इनाम करून घेतला. या घराण्याची हकीकत पुढे प्रसंगोपात येणार असल्याने त्यासंबंधी याठिकाणी अधीक उल्लेख केला नाहीं.
७ मोरेः-सा घराण्याचें “ धुळप " दुसरे उपनांव असून हे घराणेही अति प्राचीन व उच्च दरजाचे आहे. हे घराणे मूळचें उत्तरहिंदुस्थानातील असून मोरे हा " मोर्य शब्दाचा अपभ्रंश आहे. मोर्याचे राज्य नष्ट झाल्यानंतर त्या घराण्यांतील काही पुरुषांनी दक्षिणेत येऊन, दक्षिण हिंदुस्थानांतील विजयानगरच्या राज्यति नौकन्या पतकरिल्या; व पुढें श्या राज्याचा नाश झाल्यावर ते आदिलशाहींत. चाकरीत राहिले. या घराण्यासंबंधी अशी माहिती मिळते की, (बाजीराव मोरे या नांवाचा एक मनुष्य कनार्टकमध्ये नाईक असून त्यास यूसुफ् आदिलशहानें बारा हजार हिंदू पायदळांची सरदारी देऊन, निरा व वारणा या नद्यांमधील प्रदेश जिंकण्याकरिता व तिकडील शिर्के, गुजर, मामूलकर, मोहिते, महाडिक वगैरे मराठे सरदारांना नतीजा देण्याकरितां त्या प्रांतांत रवाना केले; त्याप्रमाणें मोरे यानें तिकडे जाऊन त्या सरदारांना योग्य नतीजा देऊन तो प्रदेश हस्तगत करून घेतला; स्यावरून आदिलशहाने त्यास " चंद्रराव " ( किंवा चंदरराव ) हा किताब व जावळीचे राज्य दिले. पुढे त्याचा मुलगा यशवंतराव हाही पराक्रमी निपजला, आणि त्यानें बुन्हाणनिजामशहाबरोबरील परिंडा येथील युद्धांत मोठा पराक्रम गाजवून निजामशाही हिरवे निशाण काबीज केले; ते आदिलशहाने त्यास बक्षीस देऊन त्यास तेंच आपले निशाण ह्मणून वापरण्याची परवानगी दिली व त्यास जावळीचे राज्य बहाल केलें. या घराण्याने सात पिढ्या जावळीचें राज्य केले व त्यांच्या सोम्य व उपयुक्त राज्यकारभारामुळे