देऊन " नाईक " असा किताब दिला व त्याची दक्षिणेत रवानगी करून दिली. त्याप्रमाणे दक्षिणेत येऊन तो आपल्या जहागिरीचा उपभोग घेऊं लागला; तथापि तो निंबळक येथें न राहता बाणगंगा नदीच्या कांठीं ठाण या नांवाच्या गांवीं राहूं लागला; तेच सांप्रतचें फलटण हे शहर होय. निबराज हा इ. सन १३४९ यावर्षी मृत्यू पावला व त्याच्या मागून त्याचा मुलगा दणंगभूपाळ नाईक हा त्या जहागिरांचा मालक झाला.
भूपाळ हा ब्राह्मणी राज्यांत प्रसिद्ध मनसबदार असून त्याच राज्यांतील पराक्रमी प्रसिद्ध मनसबदार कामराज घाटगे याची मुलगी नामें जैवंताबाई हिजबरोबर त्याचा विवाह झाला होता; व तिजपासून त्यास बणंगपाळ या नांवाचा एक मुलगा झाला होता. चोथे, कुचे व मुक्तबोध यांग बेदरचे सुभेदारास अनुकूळ करून सैन्य जमवून भोजनाचे वेळेस पाळ यास ठार मारिलें ( इ. सन १३७४ ) तेव्हां वणंगपाळाची तिसरी बायको व बणंग- पाळाची आई आपल्या सहा महिन्याच्या मुलासह गुप्तपणे बाहेर एका शिष्याच्या घरी जाऊन राहिली व तेथून गुतपणे इंदापूर प्रांतातील निबोडी ऊर्फ लांकडी निंबोडी या गावी गेली; परंतु तेथूनही शत्रूच्या भीतीने ती जाळोली कोळोली येथे बाळोजी पाटील ढमे याच्याकडे जाऊन राहिली; व इकडे फलटण प्रांत वणंगभूपाळ यास ठार मारणान्या शिलेदारांनी आपल्या ताब्यांत घेऊन तेच स्वतंत्र रीतीने त्या जहागिरीचा कारभार पाहूं लागले. पुढे बणंगपाळ मोठा झाल्यावर त्याने फलटण प्रांतावर स्वारी करून व चोथे, कुचे व मुक्तबोध यांना ठार मारून आपली जहागीर परत मिळविली. तो पोटशूळाच्या व्यथेने इ. सन १४०० मध्ये मृत्यू पावला. त्यानंतर त्याचा मुलगा वणंगोजी ( इ० सन १४०० ते इ. सन १४३० ) त्याचा मुलगा मालोजी ( इ. सन १४३० ते इ. सन १४३५) त्यानंतर त्याचा मुलगा बाजी नाईक (इ. सन १४३५ ते इ. सन १४६५ ) त्याचा मुलगा पवारराव नाईक (इ० सन १४६५ ते १४८०) व त्यानंतर त्याचा मुलगा दुसरा बाजीनाईक असे पांच पुरुष निंबाळकरांच्या जहागिरीचे अधिपती झाले.
६० सन १४८९ ह्यावर्षी अबुलमुज्कर यूसुफ यानें विजापूर येथे आपले स्वतंत्र अदिलशाही राज्य स्थापन केले, तेव्हां दुसरे बाजीनाईक " यांणी विजापूरचा यूसफ अदिलशहा याची भेट घेऊन, त्याचे सल्ल्याने राहण्याचा निश्चय करून, सन १४९० दृति आपले पूर्वजांनी मिळविलेली सनद दाखवून दुमालपत्र करून घेतले व ( युसफ ) बादशहाने स्वारांचा रिसाला ( दुसरे बाजी) नायकाचे ताब्यांत दिला. तो फसली ९२५ मध्ये दिला. त्याच साली तिमाजी आंग्रे याची व बादशहाची लढाई झाली. त्यांत दुसरे बाजी नाईकांनी मोठे शूरत्व केले. त्याजवरून बादशहा खूष होऊन नायकाचा मोठा सन्मान करून बखें दिली. पुढे नाईक फलटणास आले. " बाजीनाईक इ० सन १५१२