हिजरी १०९७ मध्ये विजापूर फत्ते केले व इनसाफीनें बादशहाचा मुलूस घेऊन आपल्या देवाने प्रसिद्ध मुल्क मैदान ( रणभूमीतल सिंहीण ) तोफ कार्याज केली. "
या तोफेचे अक्राळविक्राळ स्वरूप पाहून प्रेक्षकाची छातीच दडपून जाते. ही तोफ, तिच्यावर लोकांनी वरचेवर हात फिरविल्यामुळे इतकीच चकचकीत झाली आहे क तिच्यति पाहाणाराचा चेहरा स्पष्ट दिसतो. कित्येक भाविक लोक अजून तिची पूजा- अर्चा व नवस नैवेद्य करितात. इंग्लंडचा राजा चौथा विल्यम यानें ही तोफ लंडन येथे पाठवावी ह्मणून मुंबईसरकार मार्फत इ० सन १८२३ मध्ये हुबार इंजिनियर पाठविले होते; व त्यांनीं ती बुरुजावरून खाली उतरविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला होता; परंतु त्यांचा सर्व प्रयत्न व्यर्थ झालो व ती आजतागायत विजापूर येथे अवरंगझेबाने तिला स्थानापन्न केलें त्याठिकाणीच स्थाईक होऊन राहिली आहे. या बाबतींत मि० जेम्स डगलस यानें आपल्या Book of Bombay या पुस्तकांत असें झटलें आहे कीं, " लढाईच्या कामास मुल्कमेदान ही जंगी तोफ ही एक देणगीय आहे; आणि एडि- बरो येथील किल्ल्यावर " मॉन्स मेग " ह्मणून जी एक नामांकित तोफ आहे ती तर या मुल्क मैदान तोफेच्या पासंगास देखील पुरवणार नाहीं. " यावरून ही प्रचंड तोफ हैं हिंदुस्थानातीलच नव्हे तर जगांतीलही एक आश्चर्य आहे, असे हाणण्यास हरकत नाही.
याशिवाय, आर किल्ल्यांतील अनेक इमारती, जुम्मामशीद मेहेतर महाल, आसार महाल, ताजचावडी, चंदाचावडी, उंची व व्यास हीं दोन्हीं सारख्या व चमत्कारदर्शक प्रमाणांत असलेला हैदरबुरुज आणि त्याच्यावरील दोन विशाळ तोफा यापेकी दक्षिणेच्या बाजूची तोफ ३० फूट लांब असून तिचा परीघ ७ फूट व तोंडाच्या पोकळीचा व्यास १४ इंच आहे, व दुसरी उत्तरेच्या बाजूची तोफ वीस फूट लांब असून तिचा परीघ ४ फूट व तोंडाच्या पोकळीचा व्यास १० इंचाचा आहे व या दोन्ही तोफा तोडेदार घाटाच्या आहेत. शहरास भोवतालचा तट, शहराच्या कोटाचाहेरील इब्राहीमरोसा, मोती घुमज, अमीन साहेबांचा दरगा, ऐन्-उल-मुल्काचा घुमज, जहाँ बेगम घुमज, मशीद व महाल तो ऊर्फ नवरो- जपूर वगैरे अनेक स्थळांची पुष्कळ माहिती देता येण्यासारखी आहे; परंतु स्थळामावामुळे जुम्मामशदि " या एकाच अद्वितीय इमारतीची थोडक्यात पुढे माहिती देऊन इतरांचा फ्रक उल्लेखच याठिकाणी केला आहे.
तथापि वरील विवेचनावरून आदिलशाही राज्य किती वैभवसंपन्न होतें, याची कोणासही सहज कल्पना करिता येईल. मोडक त विजापूरच्या आदिलशाही राज्याच्या इतिहासांत त्या राज्याचे व तेथील राज्यकत्यांचे थोडक्यांत समालोचन केलेले असून त्यावरून या राज्याचा उदय, उत्कर्ष व या चित्र डोळ्यापुढे