Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३ ) करून त्यांचा ओघ स्वराज्याच्या कार्याकडे वळविला. आपल्या असामान्य व अलौकिक अशा अनेक सद्गुणांनी महाराष्ट्र मंडळींत आत्मविश्वास, साहसाची प्रीति व दृढनिश्चयाची उत्पन्न करून त्यांचा विकास केला. व जगांतील या अत्यंत थोर, उज्वल व श्रेष्ठतर विभू- तीनें आंखून दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे भावी काळांत मराठामंडळानें महाराष्ट्र धर्म व महाराष्ट्र राज्य यांचा संप्रदाय उत्तर हिंदुस्थानांतही वाढवीत नेला, आणि "मराठयांचें राज्य ही एक मोठी जबरदस्त व जोरदार सत्ता ह्मणून तिचें नांव कांहीं काळपर्यंत हिंदुस्थानच्या इतिहासांत सारखें दुमदुमत राहिले. 11 .. या भागांत मराठ्यांच्या उत्कर्षाचें पूर्वस्वरूप निरनिराळ्या बायतींचे विवेचन करून प्रथित केले आहे, व त्यावरून "महाराष्ट्रांतील हिंदु लोकांचा कधीही जागचेजागीं राहूं न देणारा असा अनावर लुटारू स्वभाव थोडावेळपर्यंत दडपून गेला होता खरा, परंतु त्या शांकलेल्या आगीनें मुसलमान विजयी वीरांच्या कलहामुळे पेट घेतली; आणि त्याचा परिणाम सरतेशेवटीं असा झाला कीं, सह्याद्रि पर्वतांतील अरण्यामध्ये वाळून तावलेला पाचोळा जसा काही पेट घेतो, त्याप्रमाणे हे मराठे हिंदुलोक एकदम उसळले, आणि एकसारखा भडका पसरला तेर्णेकरून दूर अंतरावर असणान्या लोकांस ही जगण्याळ भाग पाहून मोठा आचंचा वाटला. " हैं ग्रांटडफ याचे ह्मणणे वस्तुस्थितीस सोडून आहे अशी कोणाचीही खात्री होईल असा भरवंसा आहे. ५० बा० करकरे जळगांव, (पूर्वखानदेश ) ता० २६ एप्रील इ० सन १९२३ इसवी.