व्याप्त झाला; बेसुमार मद्यपान करूं लागला; बेहद विषयविलासात रममाण झाला; त्यांतच तो आजारी झाला; त्याने अनेक वैद्यांना ठार मारिलें; त्याला वेड लागलें व अशाच विपन्नावस्थेत तो २४ वर्षे व कांहीं महिने राज्य करून इ० सन १५५७ मध्ये मृत्यू पावला. त्यास अली व तहमास्प असे दोन मुलगे व दोन मुली अशी चार आपत्यें होती; त्यांपैकी त्याचा वडोल मुलगा अली अदिलशहा हा त्याच्या मृत्युनंतर आसदखानाचा मुलगा किश्वरखान याच्या मदतीनें गादीवर आला.
या शहाचा कल पहिल्यापासून शियापंधाकडे असल्यामुळे इब्राहीमशहाने त्यास त्याच्या गुरूसह मिरज येथील किल्ल्यांत ठेविलें होतें; व तेथील किल्लेदार शिकंदरखान यास कोणाहि शियापंथी मनुष्यास राजपुत्राला भेटण्याची परवानगी देऊं नये अथवा त्या धर्मपंथाची मते त्याच्या समक्ष कोणासहि बोलूं देऊं नयेत, अशी ताकीद दिली होती. पुढे इब्राहिमशहा मृत्यू पावल्यावर तो किश्वरखानाच्या मदतीने गादीवर आला, तेव्ह त्यानें सुनीपंथ मोडून राज्यांत पुन्हा पूर्वीप्रमाणे शियापंथ चालू केला. निजामशहा यानें अदिलशाहा राज्यांतील कल्याणी व सोलापूर हे किल्ले बळकाविले होते; ते परत मिळण्या- करिता शहाने विजयानगरकरांची मदत मिळवून इ० सन १५५८ मध्ये निजामशाही प्रदेशावर स्वारी केली व त्याचा सर्व प्रदेश उध्वस्त केला; त्यानंतर पुढच्याच वर्षी ३० सन १५५९ मध्ये हुसेन निजामशहानें पुन्हा अली अदिलशहावर स्वारी केली; त्यावेळीं शदानें विजयानगरकर व इमाहीम कुत्बशहा यांची मदत मिळवून हुसेन निजामशहाचा पराभव केला; परंतु या दोन्हीही स्वान्यांत विजयानगरकरांच्या सैन्यानें अनेक अनन्वित प्रकार केले व दुसरीत तर त्यांनी अत्याचाराचा कळसच केला ! विजयानगरकराविरुद्ध, मुसलमान राज्यकर्त्यांची जूट होण्यास त्यांचे हे अत्याचार, हेही एक प्रमुख कारण होऊन बसले आणि पुढे लवकरच तालीकोटच्या नैऋत्येस तीस मैलांवर मुसलमान राज्यकर्त्यांनी विजयानगरकराशी मोठ्या निकराचे युद्ध करून ते राज्य नामशेष करून टाकिलें |
त्यानंतर अली आदिलशहा हा विजयानगरच्या अवशेष राज्यांपैकींची बँकापूर वगैरे हिंदुराज्ये हस्तगत करून घेण्यास निघाला, त्यावेळी त्याने यशवंतराव भोजनाईक व देवनाईक या तिघां मराठे सरदारांबरोबर आपली बायकामुळे विजापूर येथे परत रवाना केल्याचा – ह्मणजे मराठे सरदारांवर इतकी महत्वाची व नाजुक कामगिरी सॉप- विल्याचा - उल्लेख आढळतो. त्यावेळी या मराठे सरदारांबरोबर सहा हजार मराठे " वर्गी स्वार " होते. या मराठा सैन्यानें मार्गोत कु बूशाही प्रतिति लुटालू केली; तेव्हां सलाबत- खानानें त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा पराभव केला व या मराठी सैन्याबरोबर अस- लेले फतेजंग व फतेलष्कर हे दोन उत्तम हत्ती व त्यांचे निशाणही हस्तगत करून