मराठ्यांच्या उत्कर्षाचे पूर्वस्वरूप लक्षांत येण्यास दक्षिणेतील मुसलमानी
राज्यांच्या इतिहासाचे मनन केले पाहिजे, या मुसलमानी राज्यांच्या इतिहासांतच मराठ्यांच्या
उत्कर्षाच्या पूर्वस्वरूपाचा इतिहास आहे. दक्षिणेत छत्रपति शिवाजीने मराठा साम्रा-
ज्याची स्थापना करीपर्यंतच्या काळांत मराठ्यांचा मुसलमानी राज्यांत सारखा उत्कर्मच
होत चाललेला होता. हा उत्कर्ष दुय्यम दर्जाचा होता; तरी सुद्धां भावी राज्य संस्थापनेस
तो पोषकच होणारा असा होता व त्याबरोबरच मराठ्यांचे वर्चस्वही सारखें वाढत चालले
होतें. गोवळकोर्डे, विजापूर, अहंमदनगर व बेदर या चार मुसलमानी राज्यांतील बहुतेक सत्ता=प्रायः मराठे मुत्सद्दी व मराठे योद्धे यांच्याच हातांत होती व मुसलमानांतील आपसांतील धार्मिक मतभेद, वैमनस्यैव युद्धकलह ही सारखी जोरांत असल्यामुळे वेळेला मराठ्यांचा उपयोग आपणांस करून घेता यावा ह्मणून त्यांनीच मराठ्यांना बलिष्ठ बनविले होते.दक्षिणांतांतील सर्व शाहा शियापंथी व उत्तरेकडील मोगल सुनीपंथी त्यामुळे उभयतांमध्यें धार्मिक मतभेद उत्पन्न होऊन मोंगलांनी दक्षिणेतील मुसलमानी राज्यांचा उच्छेद करण्याचा पैगाम बांधिला; दक्षिणतील मुसलमानी राज्यकर्ते अथवा दिल्ली येथील मोंगल बादशाहा यांना हिंदुधर्मी मगठा लढवय्याला मनसचदारी अथवा सरदारी देऊन प्रबळ करावें अशी केव्हाही इच्छा नव्हती. परंतु हैं राजकीय धोरण कायम ठेवून त्याप्रमाणे वागणेंहि त्यांना शक्य नव्हते; उलट दक्षिणी व परदेशी लोकांच्या मांडणांत निजामशाहाला तर स्वसंरक्षणा-करितां मराठ्यांचा तिसरा पक्ष निर्माण करणे भाग पडले होते. हा पक्ष झणजे निजामशहानें छत्रपति शिवाजीचा आजा मालोजी भोंसले यास मनसचदारी देऊन स्वसंरक्षणार्थं विश्वासुक असा निर्माण केलेला तिसरा पक्ष होय. मूर्तुजा निजामशाहा आपल्या वजिरावर राज्यकारभार सोवून आवश्याच्या किल्ल्यावर ईश्वरचिंतन करीत गहिला होता,त्यावेळी मालोजी भोसले यास त्याच्या तैनातीत ठेवण्यात आले होते. शहाजीच्या काळांत मराठ्यांच्या ह्या राजकीय महत्वास जोराचे चालन मिळाले; मूर्तुजा निजामशाहा मृत्यु पावला, त्यावेळी त्याने दक्षिणी किंवा परदेशी मुसलमानांवर विश्वास न ठेवितां, शहाजी त्यावेळी निजामशाहीत नसून सुद्धा त्याच्यावरच आपल्या बायकामुलांना सांभाळण्याचें काम निरोपाने सोपविले होतें; सोळाव्या शतकाच्या प्रारंभों वाघोजी जाधवराव नाईक या नौवाचा एक मराठा सरदार वन्हऱ्हाड, विजापूर व विजयानगर या दरबारांचा कांहीं काळ सूत्रचालक बनला होता व कर्नाटकांतील सर्व नाईकवाडी हिंदुकोज त्याच्या ताब्यांत असून त्याने किलीएकांस पदच्युत केले होते किस राज्यपद प्राप्त करून
पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
प्रस्तावना.