वर्षी - हणजे इ० सन १६३० मध्येहि अवर्षण झाल्यामुळे दुष्काळाची परमावधी झाली; माणसांचा आणि गुराढोरांचा भयंकर संहार उडाला; प्रांतचे प्रांत ओसाड झाले, व त्यांतच पटकीचीहि सांथ उद्भवून त्यामुळे आपतींचा कळस झाला; आणि इतक्यांतच दक्षिणेंत असलेल्या मोगली फौजेस कुमक ह्मणून आणखी बादशाही सैन्य येऊन धडकलें. फत्तेखान हा शहाचा मामा असल्याने त्याच्या आईनें आपल्या या भावास प्रतिबंधांतून मुक्त करण्याविषयीं शहास अनेकवेळा आग्रह केला होता; आणि आपला प्रधान नालायक असून त्याच्या मूर्खपणामुळेच निजामशाही राज्याची अशी दुर्दशा उडाली आहे असें त्यास वाटू लागले होते; ह्मणून त्यानें फत्तेखानास प्रतिबंधांतून मुक्त करून पुन्हां प्रधानपदावर स्थानापन्न केले; परंतु फत्तेखानाला अधिकारापन्न करण्याच्या बाबतीत शहानें अतीशय अवि- चार केला. कारण मोगललोक निजामशाही राज्य नष्ट करणार, आणि त्यानंतर आपल्या राज्यावरही तोच प्रसंग येणार असे पाहून महंमद आदिलशहा यानें मुर्तजा निजामशहास भेटून त्याच्याशी एक बचावाचा तह [ Defensive alliance ] केला होता; आणि त्याअन्वयें " निजामशहानें सोलापूरचा किल्ला व त्याखालील प्रदेश, आणि कोंकणांतील काहीं परगणे आदिलशहास द्यावे व आदिलशहाने निजामशहास मोंगलाविरुद्ध कुमक करावी अ ठरून उभयतांमध्यें सख्य झालें होतें, अर्थात् विजापूरकराची मदत मिळविल्यानंतर फतेखानास प्रतिबंधांतून मुक्त करण्याची मुळींच आवश्यकता नव्हती; तथापि ही चूक केली तर केली पण त्याबरोबरच त्याला पुन्हां अधिकारापन्न करण्यांत तर त्याने एवढी मोठी दुसरी चूक केली कीं, या घोड व जोड चुकीचा एक भला भक्कम खिळा झाला; आणि त्याच खिळ्यानें मुर्तुजाशहाचा मस्तकभेद करून त्यास जगांतून कायमचें नष्ट करून टाकिलें.
फतेखान प्रधानपदावर आल्यावर तो निजामशाही राज्य नव्हे, तर आपल्या हाती आलेला अधिकार नष्ट होऊं नये अशाबद्दल खटपट करूं लागला. त्यानें शहास भ्रमिष्ट ठरवून त्याची प्रतिबंधांत रवानगी केली; राज्यांतील अजमासें पंचवीस प्रमुख सरदा- ना ठार मारून सर्व राज्याधिकार आपल्या हातात घेतला; आणि शहाजहान यास खंडणी पाठवून "मी आपणास शरण येत आहे, " असें त्यानें कळविलें; तेव्हा शहाजहान याने त्याच्या उपनिर्दिष्ट सर्व कृत्यांना संमती दिली आणि प्रतिबंधांत ठेविलेल्या मुर्तजा निजामशहास ठार मारण्याविषयीं व त्या राज्यांतील जडजवाहीर, खजिना वहशी, वगैरे आपणाकडे पाठविण्याविषयीं त्यास कळविलें; त्याप्रमाणें फत्तेखानानें मुर्तजाशहास ठार मारून त्याच्या जागी त्याचा दहा वर्षाचा मुलगा हुसेन यास गादीवर बसविलें; इत- क्यांत पूर्वी विजापूरकरांशी झालेल्या तहाअन्वयें आदिलशाही सैन्य निजामशाही फौजेच्या · मदतीस आले; परंतु ज्याच्याशी हा तह झाला होता, तो मुर्तुजाशहा यावेळी मृत्यू पाव- लेला होता; व त्याला ठार मारणारा पतेखान हाच मुळ मोंगलांस सामील झालेला