Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९५)

पंडास प्रवृत्त केलें, असा तर्क बांधून ताबडतोब ठार मारिलें; नंतर या जहागिरदार मंडळींचा पिच्छा पुरवून त्यांना रानोमाळ भटकावयास लाविलें; ज्यांच्या जहागिरी जप्त करून व लुटून तो कोंडबीड येथे परत आला व तेथेही बंडखोरांना सामील असलेल्या दोनशें नाईकांना ठार मारून व तिकडील प्रदेशांत पुन्हां शांतता स्थापन करून तो हैद्राबाद येथें परत गेला.

 पुढे कासीमकोंडा येथील राजा भाई बुलंदर हा मृत्यू पावला व त्याचा बारा वर्षाचा अज्ञान मुलगा मुकुंदराय हा गादीवर आला. त्यास शहानें भाई बुलंद याचा योग्य वारस असल्याचें मान्य केलें; राजधानीत बोलावून पोपाख देऊन त्याचा योग्य सन्मान केला व कासीमकोंडा येथें परत जाण्यास रजा दिली. त्याप्रमाणें तो कासीमकोंडा येथे परत आला; परंतु त्याचा नातलग विजयाद्री याने त्यास शहाविरुद्ध भर दिली व मुकुंदगय हा अपक्कबुद्धीचा असल्यानें त्यानें विजयाद्री ( ऊर्फ विदियाद्री ) च्या सांगण्याप्रमाणे शहा- विरुद्ध वागण्याचा उपक्रम केला; आपला भाऊ देवराज यास ठार मारिलं; आणि शहाचा तिकडील सुभेदार बिरलासखान यास पकडण्याचा तो प्रयत्न करूं लागला. तेव्हां शहानें मोर-सेन उल्मुल्क या सरदारास मुकुंदरायावर स्वारी करण्याचा हुकुम दिला व त्यास मदत म्हणून वजीर मीरजुम्ला हाही भाई बुलंदर याचा भाऊ हरिश्चंद्र व पुतण्या शंकरराज यांसह तिकडे रवाना झाला. त्यानंतर या सैन्याने मुकुंदराजाशी मोठे केले. त्यांत पहिल्या झटापटीत राजमहेंद्री येथे मुसलमानांचा पराभव होऊन त्यांचा पुष्कळ नाश झाला; व शंकरराज युद्धांत मारला गेला; परंतु अखेरीस मुसलमानी सैन्य विजयी झाले; व मुकुंदराय तिकडून पळून जाऊन जलमूर प्रांत हस्तगत करून घेऊन तिकडे कारभार करूं लागला; परंतु तेथूनही त्यास मुसलमानानीं हांकलून लाविलें; तेव्हां तो बंगालदेशांत पळून गेला; इकडे मीरजुम्ला यानें त्याचा सर्व प्रदेश खालसा करून तो कुत्बशाही राज्यास जोडिला व त्याच्या बंदोबस्ताकरितां कासिमकोंडा येथें सैन्य ठेवून तो राज- धानीत परत आला.

 परंतु या मोहिमेंत मीरजुम्ला याच्या बरोबर राऊतराव या नांवाचा एक शुर हिंदू सरदार होता; स्वास- मीर जुम्ला याने कांहीं अयोग्य हुकूम दिल्यामुळे तो रागावला, - हरिश्चंद्रास बरोबर घेऊन तो मीरजुम्ला याची छावणी सोडून निघून गेला, व स्वतंत्र सैन्य जमवून हरिश्चंद्र यास कासीमकोंडा येथील त्याच्या वडिलोपार्जित राज्यावर स्थापन कर- ण्याचा स्याने उद्योग आरंभिला, तथापि कुत्बशाही सैन्याबरोबरील एका युद्धांत राऊतराव मारला गेला तेव्हा हरिश्चंद्र हा तेथून नजीकच असलेल्या बेजनाथदेव या राजाकडे