लागलींच किल्ल्यास वेढा दिला; परंतु पर्जन्यकाळ समीप आल्यामुळे त्यास वेढा उठ- वून तालुरतें परत फिरणे भाग पडलें; तथापि त्याने गंडिकोट्यास संजलखान, मुसल- मुरू येथें असीराव, नंदियल येथे जगतराव व कृष्णानदीच्या दक्षिणेकडील प्रदेशांत मूर्तिजाखान या सरदारांना आपआपल्या सैन्यासह मागें ठेविलें, त्यानंतर, कोंडबीड प्रांताच्या बंदोबस्तास विशेषशी मुसलमानी फौज नाहीं, असें पाहून व्यंकटपतीनें उदगेरीदुर्ग येथील राजा कुबलनंद याची मदत मिळवून आपला जांवई उरीयराज यास तो प्रदेश उध्वस्थ करण्याकरितां तिकडे पाठविलें; परंतु शहाच्या सैन्यानें त्याचा पूर्ण पराभव करून त्यांना माघार घेणे भाग पाडिले; तेव्हां व्यंकटपतीनें एतमराज, गुलरंगशेटी व मनूपराज या सरदारांबरोबर पुन्हां मोठें सैन्य देऊन त्यांची तिकडे रवानगी केली; परंतु यावेळी शहाच्या सैन्याने त्यांचा पराभव केला व त्यांना अयशस्वी होऊन परत येणें भाग पडलें.
अशारीतीनें लागोपाठ दोन वेळां जरी मुसलमानी सैन्याने हिंदू सैन्याचा पराभव केला तरी त्या भागांत आपलें सैन्य थोडें आहे, असें पाहून शहाने रुस्तुमखान या नांवाच्या एका सरदारास त्याच्या हाताखाली बरेंच सैन्य देऊन त्यास तिकडे पाठविलें व सर्व सैन्याचे मुख्य अधिकारही त्याच्याकडेसच सोपविले. इकडे व्यंकटपती यानेही आपली फौज पुष्कळच वाढविली व तोही या सैन्याशी युद्ध करण्याची मोठ्या जोराने तयारी करूं लागला, इतक्यांत रुस्तुमखान हा शहाच्या आज्ञेप्रमाणे त्या भागांतील मुसलमान सैन्यास येऊन मिळाला; मूर्तिजाखानाकडून त्यानें सर्व सैन्याचें आधिपत्य आपणाकडे घेतलें; व व्यंकटपतीबरोबर एकदम लढाई करण्याचा त्यानें निश्चय केला; त्यावेळीं "व्यंकटपतीशी मैदानांत समोरासमोर युद्ध केल्यानें आपणास फायदा होणार नाहीं " असें मूर्तिजाखानाचें मत होते; त्यामुळे आपल्या सैन्याचे दोन भाग करून एक भाग पेनकडे कॅडलि प्रदेशांत लूटमार करण्याकरितां पाठवावा व दुसरा भाग येथेंच ठेवून आसपासचा प्रदेश लूटमार करून हैराण करावा, अशी त्यानें रुस्तुमखानास सल्ला दिला परंतु त्याने मूर्तिजाखानाचें झणणे लक्षांत न घेता तो कृष्णानदी उतरून पलीकडे गेला आणि जेथे नुकताच पाऊस पडून जमीन ओली झालेली होती, अशा एका काळ्या मातीच्या मैदानांत तो तळ देऊन राहिला. इतक्यांत हिंदूंचा " बेंदरी आमावस्या" अथवा " पोळा " हा सण आला. त्या दिवशी अंगावर रंगीबेरंगी पट्टे ओढलेला व शिंगें सोनेरी वखनें मढविलेला असा एक भला मोठा धष्टपुष्ट व धिप्पाड बैल, त्याच्या गळ्यांत घांटा पायांत घूंगर बांधून व्यंकटपतीच्या हिंदू सैन्याने रुस्तुमखानाच्या गोटांत सोडिला . असा हा चित्रविचित्र प्राणी पाहून रुस्तुमखान अतीशय घाबरला, आपणावर हें काय अरिष्ट