Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मध्यप्रांतांतील प्रमुख वर्तमानपत्र
'महाराष्ट्र' ता. १-११-२२ मधील अभिप्रायाचा उतारा.
मराठ्यांचा इतिहास.

 (ले० श्री० दत्तात्रय बाळकृष्ण करकरे, जळगांव ) भाग १ ला. हा आमचेकडे अभिवायार्थ आल्यास बरेच महिने झाले. या भागांत प्रत्यक्ष महाराष्ट्राचा किंवा मराठ्यांचा इतिहास बिलकूल आलेला नाहीं; परंतु सुमारे १ हजार वर्षापूर्वी महाराष्ट्रात मराठा राष्ट्र निर्माण होण्याची चिन्हें दिसूं लागेपर्यंत पूर्वीच्या २13 हजार किंवा त्यांहून जास्त वर्षीचा हिंदुस्थनाचा पूर्वेतिहास या प्रास्तविक भागांत संक्षेपतःच परंतु व्यापक व मनोरंजक- रीतीनें संकलित केला आहे. वेदकालागसून-आर्य लोक मध्यएशियांत, हिंदुस्थानांत आले असें ह्मणतात, तेव्हां रासूनच – हिंदु समाजाचा व हिंदु संस्कृतींचा इतिहास थेट इ. स. १५६२ साली तालीकोटच्या लढाईनें विजयानगरच्या राज्याचा नाश होईपर्यंत विहंगम- दृष्टीने पाहून यांत मथित केला आहे. इंग्रजीत प्राचीन हिंदुस्थानच्या इतिहासाचीं कांहीं पुस्तकें गेल्या ४०/५० वर्षात पैदा झालीं आहेत; परंतु त्यांतील माहिती विवेचक दृष्टीनें व काळजीपूर्वक एकत्र करून ती मराठी वाचकांस सादर करण्याचे काम अद्यापि कोणी केले नाही. तो प्रयत्न श्री० करकरे यांनी या पहिल्या भागांत केला आहे. तेर्णेकरून माहितीच्या दृष्टीने हे पुस्तक अमूल्य व वाचनीय झाले आहे. प्रथम वैदिक व पौराणिक कालाचा वृत्तांत व दंतकथा वर्णन करून नंतर इतिहासाच्या अंधुक प्रकाशांतून मुसलमानी वर्चस्वापर्यंत ग्रंथकारानें आपला मार्ग काढिला आहे; अनेक शतकांतील राजकीय इतिहासाचा परामर्ष घेतल्यावर शेवटची शंभर पाने हिंदुस्थानचें प्राचीन वाङ्मय, तत्त्वज्ञान, राज्यव्यवस्था, गणित, ज्योतिष, युद्धशास्त्र, राजनीतिशास्त्र, शिल्प, गायन, वैद्यक, समुद्रयान,हिंदूंच्या परद्वीपांतील वसाहती, व्यापार इ. गोष्टींचें अत्यंत मनोवेधक वर्णन वाचल्यावर प्राचीन हिंदू संस्कृतीचे महत्व व वर्चस्व वाचकांच्या मनावर ठसल्याशिवाय राहणार नाहीं.अर्थात् ही पूर्वेतिहासाची भूमिका रंगविल्यामुळे त्यावर मराठ्यांच्या इतिहासाचे चित्र उठावदार दिसणार आहे. पुढे होणारे ' मराठ्यांच्या इतिहाता' चे १४९१५ भाग विचारांत न घेतले व हा भाग स्वतंत्र घेतला, तरी तो अत्येन वाचनीय व संग्रहणीय झाला आहे यांत तिळमात्र शंका नाहीं. यापुढील मागही असेच मनोरंजक व माहितीपूर्ण निपजतलि अशी माह्मांस खात्री वाटते. हल्लों साने, राजवाडे, खरे, पारसनीस, भावे, देव, चांदोरकर,
-