Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३४ ) निरनिराळे असून त्यांचे परस्परात वैर होतें; त्यामुळे पुढील धर्मयुद्धात अरब लोकांनी तुर्कांना मदत केली नाहीं, म्हणून ख्रिस्ती राष्ट्रांना तुर्कीबरोबर दोनशें वर्षे टिकाव धरितां आला; आणि मुसलमानांना जुटीच्या बळाचा फायदा न मिळाल्यामुळे आणि तोच युरोपियन खिस्ती राष्ट्रांनीं जूट करून मिळवून घेतल्यामुळे युरोपियन राष्ट्र जगून तीं पुढें बलाढ्य होत गेलीं; ज्या तुकचा, त्यांनी ३० सन १४५३ मध्यें पूर्वरोमन बादशाहतीची राजधानी इस्तंबूल, अथवा कान्स्टांटिनोपल हस्तगत करून घेतल्यानंतर सतत शंभर वर्षे सबै युरोपभर दरारा बसला होता त्या ऑटोमन तुकाचें युरोपांतील तुर्की राष्ट्र कमकुवत होत गेलें; आणि तें राष्ट्र म्हणजे पंधराव्या शतकांतील सत्ता, शौर्य व वैभव यांची निव्वळ पडछायाच म्हणून होऊन राहिलें. शिवाय या तुकांमध्येही सेल्जुक तुर्क ( Seljuk Turks ) आणि ऑटो- मन तुर्क (Ottoman Turks ) असे दोन भेद आहेत; तुर्कस्थानांत सेल्जुक या नावाचा एक सरदार होता; त्यानें आपल्या अनुयायांसह बुखारा येथे जाऊन मुसलमानी धर्माची दीक्षा घेतली व त्यानंतर त्याच्या अनुयायांना 'सेल्जुक " ही सर्व- साधारण संज्ञा प्राप्त झाली. प्रारंभी महंमद पैनंचरापासूनचे सर्व मुसलमान ह्मणजे, आरब हे लोक होत; याच लोकांनी प्रथम धर्म व राज्यविस्तार केला; अरबस्थानांतून ते दिग्विजय मिळवीत चोलेंकडे पसरले, आणि बगदाद येथील खलीफा वलीद याच्या कारकीर्दीत आरच सरदार महंमद कासीम यानें इ० सन ७११ मध्ये हिंदुस्थानांत सिंध- प्रांतावर स्वारीही केली होती; परंतु त्यांची ही या देशावर पहिली आणि शेवटची स्वारी असून हिंदुस्थानात आलेले मुसलमान म्हणजे बहुतेक तुर्क व मोंगल हेच मुख्यत्वें- करून होत; मध्य आशियांतील सपाट प्रदेशांत हे लोक, हूण व सिथियन लोकांप्रमाणे चोहोंकडे टोच्या करून मटकत फिरत असत; परंतु पुढे त्यांची संख्या अतिशय वाढत गेली, आणि ते तिकडे युरोप व इकडे सर्व आशियांत व हिंदुस्थानांतही पसरले, आणि याच लोकांनी हिंदुस्थानात राजकीय वर्चस्व मिळवून ते कांहीं काळपर्यंत इकडे पूर्ण व व्यापक प्रदेशाचे सत्ताधीश बनले; आरब लोकांनी जरी इ० सन ७११ नंतर हिंदुस्था नदेशावर स्वारी केली नाहीं, तरी इराणी आखातावर वस्ती करून राहिलेले आरब लोक हिंदुस्थानदेशाबरोबर नेहमीं व्यागरी दळणवळण ठेवीत आलेले होते, इसवीसनापूर्वी एक हजार वर्षापासून ६० सनानंतर एक हजार वर्षेपर्यंत आशिया खंडामधील मिसर, सीरिया, पालेस्टाईन, आशियामायनर, अरबस्थान, इराण वगैरे जीं राज्यें प्रसि द्वीस आली, त्यांस " सेमेटिक राज्यें " असें सर्वसाधारण नांव आहे. या सर्व सेमेटिक राज्याचा हिंदुस्थान देशावरोबर अति प्राचीन काळापासून व्यापार चालत होता स्पति "