Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२ ) , खंडांतील त्यांच्या ताब्यांतील प्रदेशही स्वतंत्र होण्याच्या मार्गास लागले. इ० सन ८२० मध्ये खोरासान प्रांत त्यांच्या हातांतून गेला आणि त्या ठिकाणी याकूब या नांवाच्या एका इसमानें आपले स्वतंत्र राज्य स्थापन केलें; त्याप्रमाणेच मध्य आशियातील बुखारा, सीरिया व आफ्रिकेतील इजिप्त वगैरे देश व निरनिराळे प्रांतिक सुभेदारही स्वतंत्र होऊन इ० सन ९४५ च्या सुमारास तर बगदादची खिलाफत पूर्णपणे कमकुवत होऊन ती पुढे इ० सन १२५८ पर्यंत कशी तरी जीव जगवून टिकत राहिली. या खलीफांच्या कारकी बगदाद है शहरही, दमास्कसप्रमाणेच अत्यंत वैभव संपन्न, रमणीय म्हणून गणले गेलेले असून त्या ठिकाणीही ठिकटिकाणीं होदे बांधून सर्व शहरभर मुबलक पाणी आणून सोडिलें होतें, व दमास्कसप्रमाणेच त्या शहरासही अपूर्व, शोमा आली होती. " सेनदेशाप्रमाणेच उत्तर आफ्रिका अरय लोकांनी जिंकिल्यावर इजिप्तदेशावर इ० सन ६४१ पासून इ० सन ८६८ पर्यंत म्हणजे २२७ वर्षे अरबांचा ताबा होता; व तेथील कारभार चालविण्याकरितां तेच इजितमध्ये आपले अधिकारी पाठवीत असतं; तथापि इ० सन ८६८ पासूनच तेथील अधिकारी स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करीत होते, त्याप्रमाणें इ० सन ९०९ मध्ये फातिमाईद वंशानें आपले राज्य इजिंत मध्यें स्थापन केले; हैं राज्य फातिमा हिच्या वंशजांनी स्थापन केले असल्यामुळे त्यास “ फातिमईंदवंश " असें ह्मणतात. या खलिफांच्या राजधानीचें शहर टयूनिस नजीक महदिया है असून सर्व उतर आफ्रिका या खलिफांच्या ताव्यांखाली होती. या खलिफांचा सरदार जवान यानें काहिरा या नांवाचा एक किल्ला बांधिला; त्याच प्रसिद्ध किल्लयाच्या पायथ्याशी हलींचें कायरो ऊर्फ कैरो है शहर आहे. या खिलाफतीचा, पुढील धर्म- युद्धांत प्रतिद्धति आलेला शूर सीरियन सरदार सलादिन यानें, इ० सन ११७१ मध्ये नाश केला; फातिमाई वंशानंतर इजिप्तमध्यें आब्बासी वंश स्थापन झाला; या संबंधी अशी माहिती आढळते की बगदाद येथील खलीफांच्या राज्यांत सेल्जुक तुर्क है अतिशय बलाढ्य व खलीफास डोईजड झाल्यानंतर इ० सन १०५० मध्ये सेल्जुक तुर्क सरदार तुघल बेग याच्याकडेस खलीफांनी राज्यकारभारासंबंधीचे सर्व अधिकार सोपविलें त्यामुळे धार्मिक शिवायच्या इतर बाबतीत फारच थोडा- अथवा "नाहीं" असेच म्हणण्याइतपत अधिकार स्खलीफांच्या हाती राहिला. ही व्यवस्था शंभर वर्षेपर्यंत, म्हणजे पूर्वेकडून मोंगल लोकांनी चेऊन सेल्जक तुर्कांना जिंकून, बगदाद शहर ताब्यांत घेऊन, तेथील खलीफा व खिलाफत यांचा नाश उडवीपर्यंत चालू होती, त्यानंतर खलीफाचा एक नातलग बगदाद येथून आपला जीव जगविण्याकरितां इजिप्तमध्ये -