Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" - " अजाजिल हे प्रमुख ह्मणून गणिले गेलेले आहेत आणि त्यांपैकीं मिकाईल हा युद्ध- समयीं साह्य करितो, अजराईल हा हिंदुलोकांच्या "थम " या नांवाच्या देवते प्रमाणे दंड करितो, आणि अजाजिल हा, इंश्वरशापानें सैतान होऊन लोकांना पापयुद्धी व पापाचरण यांच्याकडे ओढून नेतो, असे त्यांच्या शाखांत वर्णन केलेले आहे. महंमदानें नवीन धर्म स्थापन करितांना इब्राहीम, इस्मइल, इझाक, याकूब, मूसा घ ईसा, यांनी ज्या सन्या धर्माचो पूर्वी स्थापना केली, त्याच धर्माचा मी ईश्वरी प्रेरणेनें जीर्णोद्वार करीत आहे, आणि कुराण हा ईश्वरप्रणित धर्मग्रंथ आहे, व तो त्याच्या दूतामार्फत मला मिळाला आहे असें लोकांस सांगून त्यानें तो प्रसिद्ध केला असून त्यति, यारा इमामाप्रमाणेच, आदम, नोहा, इब्राहीम, मूसा, ईसा, व महंमद असे सहा पैगंबर मानिलेले आहेत. त्याप्रमाणेंच जन्नत, ह्मणजे स्वर्ग आणि जहन्नम झणजे नर्क हे मनुष्यास ज्याच्यात्याच्या पापपुण्या- प्रमाणें कायनचे मिळतात. सदाचरणाने व स्वधर्मानें मनुष्यानें अपलें आचरण ठेविलें तरच मुक्ती मिळण्याचा संभव असून, तोही निष्वळ इंश्वरी रूपेवरच अवलंबून आहे असें या धर्माबें मत आहे, यहूदी ( लणजे ज्यू ) लोकांत इबाहीम, इस्माईल, इझाक, याकूच, मूसा व हंसा ( लणजे येशु अथवा येशुख्रिस्त ) हे सद्दा पैगंबर मानितात; व ते मुसलमानासही मान्य आहेत; आणि सुंता करण्याची चाल ही त्यांनी यहुदी लोकांपासूनच घेतलेली आहे; तथापि मुसलमान, यहूदी व ख्रिस्ती धर्मात विरोध असून ख्रिस्ती व ज्यू धर्मोस सिज्दा है आसन मान्य नाहीं, व रिस्सी लोक महमदास मात्र पैगंबर ह्मणून कचूल करीत नाहींत; ख्रिस्ताच्या अनुयायांनीं निस्तास ईश्वराचा पुत्र ठरविले आहे, व तीन देव मानिले असून र्हेच मुख्यतः त्याचे स्वरूप आहे. महंमद पैगंबराच्या पूर्वी मुली लहान असतानाच त्यांना जिवंत पुरून टाकण्याची रुढी प्रचारात होती; कारण चायकांमुळे खर्च बाढून कुटुंबाची ऊधू जाते असा त्याकाळी समज होता; त्यामुळे अर्थातच बायकांची संख्या कमी होऊन अनेक बंधू मिळून एकच स्त्री करण्याचा प्रघात पडला होता; परंतु महंमदानें ही चाल बंद केला; आणि एकाच पुरुषानें चारापेक्षा अधिक त्रिया करूं नयेत, असा निबंध ठरविला; त्याप्रमाणेच त्यानें व्यभिचाराचाही सक्त बंदी केली; शिवाय कुराणांतही व्यभिचार है महा पाप गणिलेलें आहे, व त्याबद्दल स्त्रियांना देहांताची व पुरुषांना फटक्याची शिक्षा सांगितलेला आहे; शिवाय साधू संत, मानवी विभूती, अथवा इतर प्राणी किंवा वस्तू यांपैकी कशाचीही प्रतिमा करणें, त्याची पूजा करणे, मृत मनुष्याचें स्मरण कायम ठेवण्याकरिता अथवा त्याच्या विषयीं आदरभाव व्यक्त करण्याकरिता त्याचे श्राद्ध, उत्सव, पुण्यतिथी अथवा अशाच प्रकारचे दुसरे धार्मिक विधी करणें, अथवा त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना