Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमंतांचें अभिनंदन , श्रीमंत सरदार गंगाधरराव साहेब यांच्या संबंधीं या ठिकाणीं कृतज्ञतापूर्वक उल्लेख करणे आवश्यक आहे. श्रीमंतांचा व माझा लहान- पणा पासूनचा परिचय असल्याने श्रीमंतांचा, या ग्रंथास आश्रय देण्याबद्दल मी विनंती केली; व ती त्यांनी मान्य करून, मराठ्यांच्या इतिहासाच्या पहिल्या वह्या दुसऱ्या व याच्या पुढील सर्व भागांस, आपला उदार आश्रय देऊन, मला आपलें ऋणी केले आहे, इतकेंच नव्हें तर श्रीमं- तांच्या कृपेंमुळेंच हा सर्व ग्रंथ पूर्ण होणार असल्यामुळें, त्याचें श्रेय श्रीमंत सरदार गंगाधरराव साहेब यांनांच देणें इष्ट आहे. दत्तात्रय.