पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८२ )

पुन्हां अधिकारापन केल्यामुळे तर ती पुढें घोडचूक ठरली. मोंगलांची निजाम- शाहीवर धाड आल्याबरोबरच, मोंगलांनी निजामशाही नष्ट केल्यानंतर तोच प्रसंग ते आपल्या अदिलशाही राज्यावर आणितील असा दूरदर्शीपणाचा विचार करून, महंमद अदिलशहा यानें मूर्तुजा निजामशहा याच्याशी एक मित्रत्वाचा तह केला होता; व त्या अन्वयें उभयतांनी परस्परांना, मोंगलांच्या विरुद्ध जरूर पडेल त्या त्या प्रसंगी मदत करावी, असें आपसांत ठरलेले होतें. त्यामुळे फत्तेखानास बंधमुक्त करण्याचीच मुळ आवश्यकता नव्हती. परंतु मूर्तुजाशहानें अविचारानें त्यास बंधमुक्त केले; पहिल्यासारखाच सत्ताधोश बनविलें; व त्यानंतर लवकरच त्यानें आपला भस्मासुरी हात शहाच्या डोक्या- वर ठेवून त्याला इहलोकांतून नष्ट करून टाकिलें.

 फत्तेखान हा निजामशाही राज्याचा सूत्रचालक बनल्याबरोबर आपल्या हातीं आलेली सत्ता कायम रहावी म्हणून त्यानें निरनिराळी घोर व विश्वास- घाताची कृत्ये करण्यास सुरुवात केली; मूर्तुजा निजामशहा यास भ्रमिष्ट ठरवून त्याची प्रतिबंधांत रवानगी केली; राज्यांतील अजमार्से पंचवोस मोठमोठ्या सरदारांना ठार मारिलें; सर्व राज्याधिकार आपल्या हाती घेतला; माँगलास मिलाफी होण्याचे ठरवून “ मी आपणांस शरण आलो आहे " असा अर्ज त्याच्याकडे आपला मुलगा अबदुल रसूल याच्या हस्तें पाठविला; खंडणी पाठविली; बादशाही हुकुमाचें मीष करून मूर्तुजा शहास गळफांस देऊन ठार मारिलें; ( इ० सन १५३१) आणि त्याचा अज्ञान दहा वर्षांचा मुलगा शहा हुसेन ऊर्फ हुसेनशहा यास गादीवर बसवून, मोंगल बादशहाचा मांडलीक, या नात्यानें तो राज्यकारभार चालवू लागला.

 इतक्यांत पूर्वी ठरलेल्या तहाअन्वयें, विजापूरकरांचे सैन्य, निजामशाही सैन्यास मोंगलाविरुद्ध मदत करण्याकरितां त्या राज्यांत येऊन दाखल झालें. परंतु ज्याच्याशीं तह झाला होता, तो राज्यकर्ता मूर्तुजाशहा यावेळीं मृत्यू पावलेला होता; व फत्तेखान तर उघडउघडच मोंगलांना सामील झालेला होता. त्यामुळे अदिलशाही सैन्याची फसगत झाली. मोंगलांनी त्या सैन्याचा पूर्णपणे पराभव केला; व पुष्कळ नुकसान सोसून त्यांना परत जाणे भाग पडले. इकडे फत्तेखानानें शहाजहान याचे वर्चस्व मान्य केल्यानंतर, त्याने फत्तेखानाकडे