पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकाशकाचे दोन शब्द.

 वडील बंधूंच्या अकाली निधनानें अपूर्ण राहिलेल्या मराठ्यांच्या इतिहासाचा चवथा भाग प्रसिद्ध करितांना श्रीमती बाईसाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केल्याशिवाय राहवत नाहीं. बंधूंच्या निधना- नंतर लवकरच श्रीमंत सरदारसाहेब यांचेंही अकालीं निधन झाल्यानें उरलेलें लिखाण कसें प्रसिद्ध होईल ही मनास काळजी लागून राहिली होती. अशा वेळीं श्रीमती बाईसाहेबांनीं कै. श्रीमंत सरदारसाहेबा- प्रमाणेच उदार आश्रय दिला यावद्दल त्यांचे उपकार मानावे तितके थोडेच आहेत. त्याचप्रमाणे प्रस्तावनालेखक श्री. काळे यांनीं विनं- तीस मान देऊन प्रस्तावना लिहून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानणे जरूर आहे. तसेंच सदर ग्रंथाचे प्रकाशनाबाबत श्रीमंतांचे दिवाण श्री. सदाशिवराव गचके यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचा मी फार आभारी आहे.

 पूर्वीच्या तीन भागांप्रमाणेच हा भागही जनता जनार्दनास प्रिय होईल अशी आशा आहे.
जळगांव, ता. २२-१०-२९.

गो. वा. करकरे.