पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६३)

सूत्र बांधून मूर्तिजाचें मन आपणाकडे वळवून घेतलें, व नंतर लवकरच तो पुन्हां अदिलशहास सोडून निजामशाही पक्षास येऊन मिळाला. +

 इतक्यांतच मध्यंतरी, इ० सन १६२६ मध्ये आपल्या वयाच्या ८० व्या चर्षी मलिकंबर मृत्यू पावला; X आणि शहाजी हाच सर्व निजाम- शाही राज्याचा सूत्रचालक बनला. त्यानें साबाजी अनंत या मुख- दयाच्या मार्फत निजामशाहाची आई व निजामशहा यांना आपल्या बर्चस्त्रकक्षेखाली आणिलें; व सर्व निजामशाही राज्याचा तो स्वतःच कारभार पाहू लागला. इकडे मलिकंबर मृत्यू पावल्याबरोबर शहाज- दान बादशहानें जाधवरावाच्या मदतीने निजामशाही राज्याबरोबर पुन्हां मोठ्या निकरानें युद्ध सुरू केलें; आणि मोंगल सैन्य निजामशाही प्रदेशाची सारखी लांडगेतोड करीत मोठ्या धडाडीनें राजधानीवर चाल करून आले. त्यावेळी त्या सैन्यापुढे आपला निभाव लागणार नाही अशी शहाजीची खात्री झाली; तेव्हां तो विचारांत वेळ न दवडितां मूर्तुजा निजामशहा व त्याच


 + मलिकंबरचें व शहाजीचें वैमनस्य आल्यावर शहाजी अदिलशाही पक्षास जाऊन मिळण्याच्या विचारांत होता; परंतु इतक्यांतच मलिकंबर अजारी पडून मृत्यू पावला, म्हणून शहाजी अदिलशाही पक्षास जाऊन न मिळतो निजामशाही राज्यांतच राहून त्या राज्याचा सूत्रचालक बनला, असाही कित्येक ठिकाणी उल्लेख केलेला आहे.

 xअहंमदनगर जिल्ह्यांतील शेवगांव तालुक्यांतील शेवगांव-तिसगांव सडकेवरील अमरापूर या गांवीं मलिकंबर याची कबर आहे; व अहंमदनगर- जवळील आगड गांव में औरंगझेबाचें मृत्युस्थान असून तेथे त्याचा दर्गा आहे; अहंमदनगर येथे शहराबाहेर भुईकोट किल्ला, भिस्तबाग, फण्याबाग, बाग- रोजा वगैरे प्रेक्षणीय स्थळे असून नगर भिंगारपासून पांच मैलांवर शा डोंगरावर "चांदबीबीचा महाल" या नांवाची एक दगडी इमारत असून तही मोठी प्रेक्षणीय आहे.