पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३६)

 मालोजी हा शिवाजीचा आजा असून त्याच्यापासून सतत तीन पिढ्या- मालोजी, शहाजी, व शिवाजी या तीन पिढ्या-मराठ्यांच्या कर्तृत्वशक्तीची व उत्कर्षाची सारखी वाढ होत गेली; मालोजीनें मनसबदारी मिळवून स्वतंत्र होण्याचा उपक्रम केला; शहाजीनें समशेरीच्या संजीवनीनें निजामशाही जिवंत करून, व "राजे निर्माण करणारा"-"किंग मेकर" - ही पदवी मिळवून तो बहु- तेक स्वतंत्र झाला; आणि शिवाजीनें- क्षत्रीय कुलावतंस श्री छत्रपति शिवाजी महाराज यानें तर पूर्ण स्वतंत्र होऊन, व "स्वराज्य संस्थापक" हे नामाभि- धान मिळवून आपलें नांव इतिहासांत अजरामर करून ठेविलें.




ते निजामशहाच्या दरबारी गेले; आणि तेथें तरवार गाजवून त्यांनी अधिक ऐश्वर्य संपादन केलें; पुढे मालोजी इंदापूरच्या लढाईंत बादशाही कामांत खर्ची पडला; त्यामुळे कांहीं वर्षेपर्यंत विठोजीनें सरदारको चालविली; शेवटीं विठोजी मृत्यू पावल्यानंतर त्याचे व मालोजीचे मुलगे निजामशाही दरबारांत मलिकंबराच्या हाताखाली राहून सरदाराची कामे करूं लागले. " ( आपटे - कृत इतिहासमंजरी; पान १६ ते १९ पहा. ) म्हणजे मालोजी इंदापूरच्या युद्धांत मृत्यू पावला, असा शिवभारतांत उल्लेख केलेला आहे.