पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३२)

पासूनच भाविक व धार्मिक प्रवृत्तीचा होता; पुत्रजन्मामुळे त्याच्या या प्रवृ तीत भर पडली होती; आणि देवी कुलस्वामिनीचें दर्शन व तिच्या अनुग्रहानें द्रव्यलाभ, यामुळे तर त्याचा भाविकपणा विशेषच वाहून, आपण नानाप्रकारचे दानधर्म करावे, अनेक धर्मकृत्यें करून लौकिक संपादन करावा, कीर्ति मिळ वावी, अशी त्यास इच्छा झाली; त्याप्रमाणे त्या शेतांत मालोजीस हा द्रव्य- लाभ झाला तें शेत त्याने एका ब्राम्हणास दान केलें; ज्या वारुळांतून द्रव्य- मिळाले त्या वारुळावर त्यानें एक सुंदर देवालय बांधविलें; श्रीशिखर शंभू महादेव येथे दरवर्षी चैत्र महिन्यांत मोठी यात्रा भरत असे; व त्या यात्रेस लाखो लोक जमत असत; पण तेथे उदक नव्हतें; व यात्रेकरूंना फार लांबून पाणी आणण्याचा अतशिय त्रास होत होता. म्हणून मालोजीनें त्या ठिकाणी एक उत्तम स्थळ पाहून तेथें विस्तीर्ण तलाव बांधिला. वेरूळ येथील श्रीघृष्णे- श्वराचें देवालय अगदी जीर्ण झाले होते, त्याचा उद्धार केला; व आणखीही कित्येक ठिकाण तळीं, विहिरी, धर्मशाळा, वगैरे बांधून व अनेक प्रकारें दान- घर्म करून त्यानें पुष्कळ लौकीक संपादन केला.

 मालोजीची पूर्वस्थिति- म्हणजे तो पहिल्यानें जाधवरावाच्या आश्रयास जाऊन राहिला होता, त्या वेळेची स्थिति आणि या काळांतील स्थिति, यांत अतिशयच फरक झालेला होता. त्या वेळीं तो निर्धन होता; आतां तो धनवान् झाला होता; त्या वेळीं तो दुसऱ्याच्या आश्रयानें जगत होता; आतां त्यानेंच हजार बाराशें लोकांस आपल्या आश्रयास ठेविले होतें; त्या वेळी त्याला लौकिक दृष्टया कांहीही महत्त्व नव्हतें; या वेळी त्यानें आपले महत्त्व वाढवून लौकिक संपादन केला होता; गरीबीमुळे उत्पन्न होणारी नालायकी आतां नाहींशी झालेली होती; अर्थात् आतां आपण जाधवरावाच्या तोडीचे झालों

 छत्रपति शिवाजीनें दरबारांत फारशी भाषेऐवज संस्कृत भाषा वापरण्याचा उपक्रम केला, त्यावेळी "पंडितराव" रघुनाथ भट्ट उपाध्ये चंदावरकर ( रघुनाथ नारायण हणमंते ) यानें एक संकृत "राजव्यवहार कोश " तयार केला त्यांत- ही " शिलेदार " या शब्दाची "शिलेदार: स्वतुरंगी" म्हणजे स्वतःचा घोडा बाळगून नौकरी करणारा, अशीच व्याख्या केलेली आहे.