पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३४७)

महाराजा सरफोजी याच्या स्वरूपाचें पूर्ण वर्णन करावयाचे म्हणजे, तो शरीरानें मजबूत, अतीशय देखणा, व मध्यम वयाचा असून एखाद्या सुंदर बहिरोससाण्याप्रमाणे त्याचे डोळे व नाक आहे. त्याच्या मिशा फार झुपकेदार व करड्या आहेत. बहुधा नेहमी त्याचा पोषाख भपकेदार असतो. पण दागिने घालण्याची बायकी होस त्यांत नसते; आणि तो नेहमी नमुनेदार व मनाला आनंद होणा-या, फ्रेंच जनरल ऑफिसरप्रमाणे दिसतो, आणि बोलतों. यापेक्षा त्याची तुलना करण्याला दुसरा अधीक योग्य मनुष्य माझ्या लक्षांत येत नाही. " आणि वरील विवेचनावरूनच सरफोजीराजे हा केवढा अलौकिक राजपुरुष होता, याची सहज कल्पना होण्यासारखी अस ल्याने त्या बाबतीत अधीक विवेचन करण्याचें कांहींच कारण राहात नाहीं.

 सरफोर्जी राजा हा इ. सन १८२८ मध्ये मृत्यु पावला. त्यास मुक्तंबा- बाई व अहिल्याबाई, अशा दोन धर्मपत्न्या होत्या. त्यापैकी मुक्तंबाबाई ही अकाली मृत्यु पावलो. दुसरी धर्मपत्नी अहिल्याबाई हिचे पोर्टी, त्यास तीन कन्या व एक पुत्र झाला. पुलाचें नांव शिवाजी है असून, तो सरफोजीच्या मृत्यूनंतर ता. १७ मार्च इ. सन १८३२ रोजी तंजावरच्या नामधारी गादी- वर आधिष्ठित झाला.

 सरफोजी राजे हा मोठा विद्वान व बिद्याविलासी राजपुरुष असूनही, शिवाजीराजे यांस विद्येचा विशेष व्यासंग व अभिरुची लागली नाही. सर- फोजी राजे यानीं त्यांस, त्यांच्या लहानपणापासून उत्तम शिक्षण देण्याचा अति- शय प्रयत्न केला. अखेर त्यांस पुष्कळ प्रतिबंघांतही ठेविले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाहीं. तथापि तो मोठ्या मोकळ्या मनाचा, सुस्वभावी, व उदार असुन अतिशय खर्चिक होता. आणि तोही इतका की, त्यामुळे त्याची दक्षिण हिंदुस्थानांत अतीशय प्रसिद्धि होऊन, त्यास " दानशूर कर्ण" असें नामाभिधान प्राप्त झाले होतें.

 तंजावरचा राज्यकर्ता सरफोजी, याच्याबरोबर इ. सन १७९९ मध्यें इंग्रजांनी जो तह केला, त्याअन्वयें तंजावर संस्थानची सर्व राजसत्ता ब्रिटिश सरकारच्या हातांत गेली. त्यामुळे सरफोजी राजे व शिवाजी राजे या उभय- तोनांदी, स्वतःच्या खाजगी दौलतांशिवाय दुसरे राज्याधिकार कांहीच