पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३२५ )

नंतर इ० सन १७७१ मध्ये नवाचानें मद्रासकर इंग्रजांची मदत घेऊन प्रतापसिंहाचा मुलगा तुळसाजी याजवर हल्ला केला. तुळसाजीस तह करणे भाग पडलें या तहानें तुळसाजीला व त्याच्या संस्थानालाही अत्यंत कर्ज होऊन, तंजावर संस्थानाच्या उत्पन्नाच्या पुष्कळ बाबीही कमी झाल्या. ह्या दुसन्या तहांत तंजावरच्या राजाचे सर्व हितसंबंध, महंमदअल्लो व त्याचे इंग्लिश सावकार, यांच्या लोभास बळी द्यावे लागले; हे सावकार सांगतील त्याप्रमाणे मद्राससरकार चालत असे. इंग्लिशांनी दिलेली वचनें पाळलींच पाहिजेत, असा निर्बंध राहिला नाही. " तंजावरचें राज्य तेथील राजाकडे चालावें.अशाबद्दल इंग्लिशांनीं इ० सन १७६२ मध्यें जी हमी घेतली होती, तीस त्यांनी घाब्यावर बसविलें. त्यानंतर, इ० सन १७७३ मध्यें महंमदअल्लोनें इंग्लिशांची मदत घेऊन पुन्हा लुटालूट करण्यास प्रारंभ केला. राजास कैद केले, त्याचें शहर (तंजावर) हस्तगत करून घेतले व तंजा- वरचा सर्व प्रांत नबाबानें खालसा करून तो आपल्या राज्यास जोडिला. "हे लुटालुटीचे व विश्वासघाताचे सर्व प्रकार मद्राससरकारनें आपल्या जवाब- दारीवर, व महंमदअल्लांच्या इंग्लिश सावकारांच्या फायद्यासाठी सुरू केले होते; " इंग्लंडमधील “ कोर्ट ऑफ् डायरेक्टर्स" यांना त्या गोष्टीची मुळींच बातमी नव्हती; परंतु त्यांना जेव्हां वरील अन्यायाची हकीगत समजली तेव्हां स्यांनी ह्या वर्तणुकीबद्दल मद्राससरकारचा मोठ्या जोरानें निषेध केला. अर्काटचा नवाब व तंजावरचा राजा यांच्यामधील भांडणांत फाजील मन घालून ती गोष्ट इतक्या विकोपास नेली, याबद्दल त्यांनी मद्राससरकारचा चांगलीच कानउघाडणी केली. मद्रासचा गव्हर्नर व मद्रास कौन्सिलचा प्रेसिडेंट मि. विंच याजवर अप्रयोजकपणाचें व अन्यायाचें कृत्य केल्याचा दोष ठेवून त्यास कामावरून दूर करून परत बोलावून घेतलें. लॉर्ड पिगट यांस मद्रासचा गव्हर्नर व तेथील कौन्सिलचा प्रेसिडेंट नेमून त्याची इकडे रवानगी केली. तंजावरच्या राजास बंधमुक्त करून त्यास पुन्हा गादीवर बसवावें, असा ठराव केला व तसा मद्राससरकारास त्यांनी हुकूम पाठविला. त्याप्रमाणे लार्ड पिगाट यानें तुळाजी राजे यांस ता० ११ एप्रिल इ० सन १७७६ रोज मोठ्या समारंभानें पुन्हा तंजावरच्या गादीवर बसविलें व