पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३२० )


अत्यंत अनिष्ट परिणाम आपणास भोगावे लागतील, अशी तुळाजीस इकडे भीति होती; आणि हैदरअल्ली आपल्या कसलेल्या सैन्यानिश आपणासमोर उभा आहे, त्याच्याशी सामना देण्यास आपण अगदोंच असमर्थ आहो, आपले स्नेही इंग्रज व महंमदअल्ली हे दूर आहेत, हैदरभल्ला प्रत्यक्ष समोर उभा आहे, आणि त्यास खंडणी देऊन वाटेस लावला नाही, तर तो खंडणी तर मुक्ती- तीनें वसूल करीलच, पण खुद्द तंजावर शहराची व राज्यांतील प्रदेशाची खात्रीनें पूर्ण धूळधाण उडवील, अशी तुळाजीस तिकडे भीति होती. अशा संकटप्रद स्थितीत दुर्बल व परस्याधीन तुळाजीस, हैदरअल्लीला खंडणी देण्या- शिवाय गत्यंतरच नव्हते. त्यामुळे त्यानें हैदरअल्लीस चार लाख रुपये रोख, व पांच इत्ती नजर देऊन वाटेस लाविले, परंतु यामुळेच महंमदल्ली तुळाजी- वर अतीशय रागावला. तंजावरवर स्वारी करण्याला त्याला ही योग्य संधि व सबब मिळाली; आणि त्याने तंजावरवर चाल करून जाण्याला इंग्रजांची मदत मागितली. मद्रासच्या गव्हर्नरने महंमदअलीच्या ह्या राजकारस्थानास प्रथम पाठबळ दिले नाही. परंतु इंग्रज व महंमदअल्ली यांच्यामध्ये बराच पत्र- व्यवहार झाल्यानंतर, महंमदल्लीच्या इच्छेप्रमाणे तंजावरवर उभयतांनी मिळून स्वारी करावी, असे ठरलें, तथापि तंजावरकराशीं एकदम युद्ध सुरू न करितो महंमदअलीचा मुलगा उमदत-उलू-उमराव यांस सर्व अधिकार देऊन तुळाजी राजे यांजकडे बोलणे करण्याकरितां पाठविण्यांत आलें; व त्यानें तुळाजीपुढे कांही अटी मांडिल्या. पण त्या तुळाजीनें अमान्य केल्या. तेव्हां मद्रासकरांनी नबाबाच्या सैन्यास मदत म्हणून, जनरल स्मिथ याच्याबरोबर बरेंच सैन्य देऊन त्याची तंजावर प्रांतावर, रवानगी केली. त्याप्रमाणे तिकडे जातांना, तंजावरकरांच्या ताब्यांत असलेला मार्गातील बलमचा किला हस्त- गत करून घेऊन, ( इ० सन १७७१; सप्टेंबर महिन्यांत ) तंजावर येथे येऊन त्याने तेथील किलपास वेढा दिला, व उभय पक्षांमध्ये मोठेच हातघाईंचे युद्ध झालें. तंजावरच्या सैन्यानेही या युद्धांत आपले चांगलेच शोर्य व्यक्त केले. परंतु तंजावरकराचा पक्ष मूळचाच कमजोर व असाहाय्य असल्यामुळे, तंजावरचा किल्ला शत्रूपक्षाच्या हस्तगत होणाच्या अगदर्दी बेतांत आला; व आतां किल्ला हस्तगत होणार तोच तंजावरच्या राजानें नबाबाचा